• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार, रोहित पवारांचं गाडीवर चढून भाषण; सरकारकडे काय मागणी केली?

September 7, 2026 by admin Leave a Comment


पुण्यात विद्यार्थी आंदोलन तापलं आहे. पुण्यात MPSC पेपरफुटीच्या विरोधात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये रोहित पवार देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी काळा शर्ट घालत सरकार आणि अध्यक्षांचा निषेध केला. पैसे खाण्यासाठी गरीब मुलांचं नुकसान करत आहेत. पेपरफुटीवरून आता एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवार यांनी केली. यावेली रोहित पवार यांनी गाडीवर चढून विद्यार्थ्यांना संबोधित केले. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

आमदार रोहित पवार म्हणाले, सरकारचा आणि अध्यक्षांचा निषेध करतोय म्हणून काळा शर्ट घातलाय. पैसे खाण्याच्या नादात गरीब मुलांचं नुकसान होत आहे. एमपीएससीचा अध्यक्ष आणि सचिव बदलण्यात यावा. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी एमपीएससीवर असावेत. सरकारचा आणि एमपीएससीचा निषेध करण्यासाठी मी काळा शर्ट घातला आहे. सरकारचं दुर्लक्ष होत आहे, नफाखोरी सुरू आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. रस्त्यावर हा रोष उतरलेला आहे. पेपरफुटीमुळे गरीब विद्यार्थी अडचणीत आला आहे’.

रोहित पवार म्हटलं की, विद्यार्थी काढलेला मोर्चा आहे. ही आलेली लोक आहेत. आणलेली लोक नाहीत. हक्कासाठी विद्यार्थी लढत आहेत. 20 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. परंतु 50, 60 लाख देऊन इतर कोणी अधिकारी होत असेल, हे विद्यार्थ्यांना मान्य नाही. विद्यार्थ्यांना मान्य नाही. महाराष्ट्राला मान्य नाही. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात MPSC पेपर, भरतीमध्ये होत आहे. भ्रष्टाचार गाडला गेला पाहिजे. त्या महत्वाच्या आहेत’.

रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटलं ?

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘MPSC च्या उत्पादन शुल्क परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही, तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आलंय. हे धक्कादायक आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा. दुसरीकडे आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही. म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे. MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही’.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त फॉलोअर्स, सौंदर्य पाहूनच…
  • Maruti Suzuki : सणांच्या काळात Maruti ने ग्राहकांना दिला झटका, या मॉडल्सच्या किंमती वाढल्या 20000 हजार रुपयापर्यंत
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी मला… भारत अमेरिकेच्या संबंधांवर मोठा दावा, गोर यांनी थेट..
  • आता एक लाखाचं सोनं घेतलं तर २०५० साली त्याचे किती होतील ? आकडा धक्कादायक
  • ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in