• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले, चालकाला अटक

June 30, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील हडपसर परीसरात मोठा अपघात झाला. एका भरधाव आयशर टेम्पो चालकाने अनेक वाहनांना त्यांनी धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. पुणे- सोलापूर मार्गावर भरधाव धावणाऱ्या या टेम्पो चालकाला फातिमानगरातील एका वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तरी चालक थांबल्याने त्याने तसेच वाहन दामटवल्याने पुढे त्याने अनेक वाहनांना ठोकरले. चालक मद्यधुंद असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी या वाहतूक पोलिसाच्या अंगावरही वाहन धडकवण्याचा चालकाने प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

पुण्याच्या हडपसर येथे पुणे–सोलापूर महामार्गावर एमएच 42 एआर 4246 क्रमांकाच्या आयशर टेम्पो चालकाने भरधाव वाहन चालवत मोठा अपघात घडवला. या वाहनाच्या ठोकरल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. पुण्यातील हडपसरकडे जाणाऱ्या फातिमानगर ते मगरपट्टा रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. अखेर 15 नंबर चौकात टेम्पो अडवण्यात यश आले. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले असून पुढील चौकशी सुरू आहे.

चालकाला पकडण्यात आले

सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे लेनवरून पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर आला. त्यामुळे या टेम्पोच्या आघाताने अनेक वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणात श्रीकांत दत्ता कांबळे (वय-24, रा. मुबारकपूर, ता. निलंगा, जि. लातूर) या चालकाला पकडण्यात आले आहे. या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर
  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in