• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाने 200 वर्षे जुने घर पडले, भिंतीतून गुप्तधनाची अक्षरश: बरसात झाली, तरीही कोणी हात लावेना, कारणही भीतीदायक..

August 8, 2026 by admin Leave a Comment


झारखंडच्या हजारीबागपासून ४० किलोमीटर दूरवर टाटीझरिया येथे अमनारी गावातील एका घरातून मोठा खजाना मिळाला आहे. या गुप्त धनाची चर्चा हजारीबाग पासून रांची पर्यंत पोहचली आहे. याविषयीचे कुतूहल जागृत झाले आहे की एका मातीच्या घरात अखेर खजाना जास्त आहे. ज्यात घरात हा खजाना सापडला आहे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे की त्यांची पिढीजात संपत्ती आहे आणि यामागे काही आख्यायिका देखील आहेत.

पावसात जुने घर पडले…

टाटीझरिया येथील अमनारी गावाची चर्चा सध्या हजारीबाग सह संपूर्ण झारखंड येथे होत आहे. या गावात पावसाने एक जुने मातीचे घर वाहून गेले. त्यानंतर या घरातून खजाना मिळाला आहे. पावसाने जुने मातीचे घर पडल्याने त्यात लपवलेले गुप्तधन बाहेर पडले आहे. जेव्हा घर पडले तेव्हा भिंतीतील घडा फुटल्याने ३०० हून अधिक प्राचीन चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यांची चमक पाहून त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमली आणि संपूर्ण भागात ही बातमी आगीसारखी पसरली.

हे जुने घर अमनारी येथील रहिवासी बैजू महतो यांचे आहे. घर जीर्णशीर्ण झाल्याने बैजू महतो यांचे कुटुंब जवळच बांधलेल्या पक्क्या घरात राहातात. या भागात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर हे मातीचे घर सकाळी अचानक कोसळले. या घरात कोणी रहात नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, जुने घर पडल्यानंतर भिंतीच्या आत लपवलेल्या हंडा तुटून त्यातील जवळपास ३०० हून अधिक चांदीची नाणी जमिनीवर पसरली. कुटुंबाला याची खबर लागली तर ते देखील आश्चर्यचकीत झाले.

बैजू महतो यांचा मुलगा नंदकिशोर प्रसाद यांनी सांगितले की ही त्यांची पिढीजात संपत्ती आहे.त्यांचे घर २०० वर्षे जुने आहे. त्यांच्या वडीलांचे वय आता ९१ वर्षांचे आहे आणि चार पिढी आधीचे हे घर आहे. नंदकिशोर प्रसाद यांनी सांगितले की याआधी देखील भिंत पडल्याने चांदीची नाणी सापडली होती. यावेळी मात्र चांदीची नाणी जास्त आहेत. या गुप्तधनाला कोणी हात लावला किंवा चोरी केली तर अघटित घडते अशी मान्यता आहे, त्यामुळे एकाने देखील या नाण्यांना हात लावलेला नाही. कारण २४ तास होऊनही कोणत्याही व्यक्तीने या नाण्यांना हात लावलेला नाही.

आता दुसऱ्या घराची देखील चर्चा

टाटीझरिया भागात या गावातील गुप्तधनाची चर्चा सुरु आहे. गावकऱ्याच्या मते बैजू महतो यांच्या पूर्वजांच्याद्वारा जतन केलेली ही संपत्ती आहे. आता या गुप्तधनाचा थांगपत्ता लागल्यानंतर बैजू महतो यांचे दिवगंत बंधू बढन महतो यांचेही जुने मातीचे घर आहे. त्यांच्या भिंतीतही अशा प्रकारची चांदीची नाणी ठेवलेली असू शकतात असे म्हटले जात आहे.

ही नाणी किती जुनी ?

टाटीझरियाच्या अंचलचे पदाधिकारी अमित कुमार झा यांनी सांगितले की नाणी सापडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. याची माहिती जिल्ह्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली आहे. ही संपत्ती त्यांच्या घरात सापडल्याने ती त्या घरातील मालकाची आहे. जर जमीनीच्या आत संपत्ती मिळाली असती तर ती सरकारने जप्त केली असती. या प्रकरणात जसे वरिष्ठ अधिकारी सूचना देतील तशी पुढील कारवाई होणार आहे. ही चांदीची नाणी अजूनही तशीच जमीनीत पडून आहेत.आता लोकांचे लक्ष याकडे लागले आहे की ही चांदीची नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत. त्यांची खरी किंमत काय आहे ? दोन शतकांहून अधिक काळ या नाण्यांना अशा प्रकारे भिंतीत का लपवून ठेवले होते याची उत्सुकता लोकांना लागली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in