
पाकिस्तानी कोणत्याही वस्तूचे फेक व्हर्जन काढण्यात हुशार म्हटले जातात. कधी पिझ्झा हटचे नकली स्टोर, तर कधी मॅकडोनाल्डची नकली आऊटलेट. पाकिस्तानात मोठ – मोठ्या ब्रँडचे फेक आणि नकली व्हर्जन लगेत तयार होतात. एक अशाच प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक परदेशी नागरिक पाकिस्तानच्या एका नकली डोमिनोज स्टोर मध्ये बसून या फेक डोमिनोजचा आस्वाद घेताना दिसत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @alexwandersyt नावाच्या हँडलने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की पाकिस्तानचे फेक डोमिनोज ! व्हिडीओ नुसार या डोमिनोजने नावाची नक्कल केली आहे.मात्र, त्याची चव खऱ्या पिझ्झा सारखी अजिबात नाही. हे फेक पिझ्झा स्टोर पाकिस्तानच्या हुंजा विभागात वसलेले आहे.
व्हिडीओत परदेशी व्यक्ती नकली डोमिनोज स्टोरमध्ये बसलेल्या ग्राहकांच्या दिशेने कॅमेरा नेतो आणि सांगतो की या लोकांनी नक्कल देखील ठीक प्रकारे केलेली नाही. त्यानंतर तो स्टोरच्या आत जातो. त्यानंतर तो काऊंटरवर पोहचून थेट सवाल करतो. हे असली डोमिनोज आहे की नकली ? यानंतर तेथे बसलेला स्टाफ उत्तर देतात हे पाकिस्तानी डोमिनोज आहे.
परदेशी व्यक्ती म्हणतो की हे खरे आहे की हे पाकिस्तानी डोमिनोज आहे. त्यानंतर मेन्यू कार्डवरील माहिती हा व्यक्ती वाचतो. त्यात पिझ्झाचे प्रकार आणि त्याची किंमत पाहण्यास सुरुवात करतो. त्यानंतर तो एक चिकन सुप्रीम पिझ्झा ऑर्डर करतो. काही वेळानंतर त्याच्या टेबलवर पाकिस्तानी डोमिनोजचा पिझ्झा येतो.
विदेशी व्लॉगर म्हणतो की पाकिस्तानच्या हुंजा भागातील या फेक डोमिनोजमध्ये मिळणाऱ्या या पिझ्झाला मी १० पैकी १.७ रेटिंग देईल. कारण हा खूपच वाईट आहे. या व्हिडीओवर खूप लोकांच्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत.
एका युजरने लिहिलंय की पाकिस्तानी लोकांना पिझ्झा तयार करता येत नाही. यांच्या येछे डोव्ह खूपच जाड असतात. त्यांच्या खूप सारे चीझ भरलेले असते. हे लोक एक प्रकारे फ्लफी पेस्ट्री तयार करतात. एका युजरने लिहिलेय की पाकिस्तानी देशच फेक आहे. ओरिजनल तर इंडिया आहे.अन्य एका युजरने लिहिलंय की हा डोमिनोज चायनीझ असावा. कारण पाकिस्तानी लोकांनी नकली आणि सेकंड आणि थर्ड कॉपी खूप पसंद आहे.
Leave a Reply