• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;

September 1, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेच्या अ‍ॅरिजोनामध्ये आज नेपाळसारखीच परिस्थिती उद्भवली. अ‍ॅरिजोनाच्या अँजेल कैन्यन आणि फँटम रेंच परिसरात अचनाक पूर आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अमेरिकन नॅशनल पार्क सर्व्हिसनुसार, या घटनेनंतर 20 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. हे लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 29 ऑगस्ट रोजी ब्रायंट एंजेल क्रीक कॉरिडोअरसोबत कैन्यनमध्ये एखाद्या हायकर्स वा बॅकपैकर्स असल्याचं माहित असेल किंवा प्रभावित कॅरिडोअरमध्ये कँप ग्राऊंड रिझर्व्हेशन कुणी केलं असेल तर त्याची माहिती नॅशनल पार्क सर्व्हिसच्या इनव्हेस्टिगेटिव्ह सर्व्हिस ब्रँचला द्या. असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सिन्हुआ वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार, पार्कचे अधिकारी अ‍ॅरिजोना डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीसोबत मिळून मदत कार्य करत आहेत. तसेच प्रभावित क्षेत्रातील लोक सुरक्षित आहे की नाही याची माहितीही घेण्यात येत आहे. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजीच्या सकाळपर्यंत प्रशासनाने 62 लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. फँटम रेंच आणि लोअर नॉर्थ काइबाब ट्रेल परिसरातून या लोकांची सुटका करण्यात आली आहे.

सर्व पादचारी पूल वाहून गेले

सुटका करण्यात आलेल्या लोकांना साऊथ रिम येथील मॅस्विक लॉज कॅफेटेरियामध्ये आणण्यात आलं आहे. या ठिकाणी अमेरिकन रेड क्रॉस त्यांची मदत करत आहे. प्रशासनाच्या मते, ताज्या आकडेवारीनुसार, अजून पर्यंत या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. अचानक आलेल्या पुरामुळे ब्राइट अँजेल कैन्यनच्या मूळ ढाच्याला मोठं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ब्राइट अँजेल क्रीकवर बनवण्यात आलेले सर्व पादचारी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांना नदी पार करून जाणं कठिण झालं आहे.

वादळाचा इशारा

दरम्यान, या पुरामुळे किती नुकसान झालं याची मोजदाद सुरू आहे. पार्कचे कर्मचारी ट्रेल्स, पूल, वीज-पाणी पुरवठा करणारी यंत्रणा, इमारती आणि इतर काय काय नुकसान झालं याची माहिती घेत आहेत. त्याशिवाय या भागात वादळी पावसाचा अलर्टही जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यापेक्षा अधिक फ्लॅश फ्लड, मातीचा ढिगारा वाहून जाणे, डोंगराच्या कडा कोसळणे आदी घटनांमुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने, बचाव कार्य सुरू असल्यामुळे सतर्क राहण्याचे आणि प्रभावित क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ असल्याशिवाय जेवण होतच नाही..
  • भारतातील या व्हिस्कींनी जगभरातील पिणाऱ्यांना झिंगवलं; नावं ऐकून वाटेल आश्चर्य
  • महायुतीत मिठाचा खडा? भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याचे संकेत, KDMC मध्ये काय घडतंय?
  • महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
  • मनोज जरांगे पाटलांचं उपोषण, आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? शिंदेंनी दिल्लीतून स्पष्टच सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in