• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानी क्रिकेटपटूवर थेट दोन वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं? इतकी मोठी शिक्षा देण्याचं कारण की…

August 6, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पीसीबीच्या एका कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू हमजा नजर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पाकिस्ता क्रिकेट बोर्डाने त्याच्याविरोधात कठोर कारवाई करत दोन वर्षांची बंदी घातली आहे. इतकंच काय तर दंडही ठोठावला आहे. आता हमजा नजर पुढचे दोन वर्षे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. हमजा नजरने केलेल्या कृत्याप्रकरणी पीसीबीने एक तपास समिती गठीत केली होती. त्या समितीसमोर हमजा नजर आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं. त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध माहितीचा आढावा घेऊन समितीने आपला अहवाल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुपू्र्द केला होता. त्यानंतर पाकिस्तान बोर्डाने कारवाईचा बडगा उचलला आहे. नुकतंच लीजेंड्स क्रिकेट स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करणार असल्याचं पाकिस्तानने जाहीर केलं होतं. त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हमजा नजरवर बंदी घातली आहे.

हमजा नजरवर बंदी घालण्याचं कारण की…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक अहवाल सादर करत स्पष्ट केलं आहे. हमजा नजरवर दोन वर्षांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास बंदी असेल. त्याचबरोबर त्याच्यावर 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हमजा नजरने पीसीबीमार्फत व्हिसासाठी अर्ज करताना खोटी माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. अर्ज करताना त्याने खोटी आणि अपूर्ण माहिती दिली होती. तसेच काही तपशील लपवले होते. तसेच दिशाभूल करणारे विधानं केली होती.

हमजा नजर 27 वर्षांचा असून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीला अद्याप सुरूवात झालेली नाही. पण त्या आधीच त्याला बंदीला सामोरं जावं लागलं आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 27 डावात 748 धावा केल्या असून 26 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतकं आहे. त्याने 15 लिस्ट ए सामन्यातील 13 डावात 192 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 18 विकेट घेतल्या आहे. हमजाने 10 टी20 सामन्यात 65 धावा केल्या आहेत आणि पाच विकेट घेतल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम
  • हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…
  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in