• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानचे 3 तुकडे होणार, पाकिस्तानच्या नेत्याने संसदेत सांगितले पासपोर्ट लागणार..

July 31, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. वाढती महागाई आणि वीजेच्या वाढलेल्या दराच्या मुद्द्यात लोकांमधील रोष वाढला. यासोबतच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागलीये. गेल्या काही दिवसांपासून लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला. ज्यात 40 आंदोलक ठार झाले तर हजारो गंभीर जखमी झाले. पाकिस्तानच्या अनेक भागात अशांतता पसरली आहे. लोकांचा रोष वाढत आहे. पाकिस्तान भीकेला लागला. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्यामध्येच आता पाकिस्तानचे तुकडे पडण्याची स्थिती निर्माण झाली. याबाबत गंभीर चिंता थेट पाकिस्तानी संसदेत खासदाराकडून व्यक्त करण्यात आली.

यादरम्यानचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तान विभागला जाणार असल्याची चिंता आता संसदेतही व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या संसदेत खासदार मौलाना अता-उर-रहमान यांनी म्हटले की, पाकिस्तान आता विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तळमळ स्पष्ट दिसत आहे.

संसदेत भाषणादरम्यान त्यांनी म्हटले की, तो दिवस दूर नाही जेव्हा बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये जाण्यासाठी आपल्याला पासपोर्टची गरज भासू शकते. त्याचे हे विधान सध्याच्या परिस्थितीवर अत्यंत सूचक विधान आहे. म्हणजेच पाकिस्तानचे तुकडे पडू शकतात, असे त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत म्हटले. पाकिस्तानमध्ये विभाजन होईल, अशीच परिस्थिती आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. लोक रस्त्यावर येऊन विभाजणाची भाषा करताना दिसत आहेत.

🚨 पाकिस्तान के टूटने की चिंता अब संसद में सुनाई पड़ रही है !

▪ पाकिस्तान की संसद में सांसद मौलाना अता-उर-रहमान ने कहा कि पाकिस्तान अब टूटने की कगार पड़ है।

▪ उन्होंने कहा कि “वह दिन दूर नहीं जब हमें बलूचिस्तान और खैबर पख्तूनख्वा (KPK) जाने के लिए पासपोर्ट की जरूरत पड़ सकती… pic.twitter.com/as159oAuU6

— Madhurendra kumar मधुरेन्द्र कुमार (@Madhurendra13) July 31, 2026

पाकिस्तानमधील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी एक धक्कादायक विधान देखील केले. जाहीरपणे कबूल केले आहे की,पाकिस्तानची सध्याची शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशाची 70 वर्षे जुनी व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले. आता पाकिस्तानचे काही तुकडे पडू शकतात, अशी परिस्थिती आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in