• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

परत जा, तिथे कमवा अन् खा..; मराठी सक्तीविरोधात रिक्षाचालकांच्या संपावरून हेमंत ढोमेनं सुनावलं

April 23, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला आहे. या निर्णयावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. यावर विविध मराठी कलाकार प्रतिक्रिया व्यक्ती करत आहेत. एकीकडे अभिनेता रितेश देशमुखने सरनाईकांच्या निर्णयाचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शिक हेमंत ढोमेनं संपावर जाणाऱ्या रिक्षाचालकांना सुनावलं आहे.

हेमंत ढोमेची पोस्ट-

’15 लाख आहेत म्हणजे.. मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं.. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा,’ अशी पोस्ट हेमंतने लिहिली आहे. मराठी भाषा टिकली पाहिज, जगली पाहिजे आणि वाढली पाहिजे.. अशी हेमंतची आधीपासूनचीच भूमिका आहे. याच भूमिकेतून त्याने ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा मराठी शाळांबद्दलचा आशयघन आणि तितकाच मनोरंजक चित्रपट बनवला होता. त्यामुळे भाषा सक्तीविरोधात संपावर जाण्याला त्याने ठाम विरोध केला आहे.

रितेश देशमुखनेही भाषा सक्तीचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली आहे.

राज्यात रिक्षा चालकांच्या परवान्यांची पुनर्तपासणी करताना कागदपत्रांसह चालक मराठी बोलतो की नाही, याचीही शहानिशा करण्याच्या सूचना प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्या आहेत. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी भाजपने मराठी शिकवणी वर्गसुद्धा सुरू केले आहेत. काही रिक्षा चालकांनी त्यासाठी मराठी भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं, देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली
  • रुद्राक्ष दाखवून धमकावलं, लॉजवर नेऊन अत्याचार; नाशिकमधील आणखी एका भोंदू बाबाच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला
  • IPL 2026 : अभिषेक शर्मा पाकिस्तानच्या एका खेळाडूला रोज नुसता कानफटवतोय, पुढच्यावेळी बोलण्याआधी दहावेळा विचार करेल
  • डेब्यू करताच चमकलं हिचं नशीब, 28 व्या वर्षी बनली सुपरस्टारची गर्लफ्रेंड – पत्नी आणि आई..!
  • 1 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगतेय ही अभिनेत्री, लवकरच होऊ शकते सुटका, केलेली 102 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in