• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं, देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली

April 23, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानवर अज्ञान शस्त्रधारी लोकांकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. सध्या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच अमेरिका आणि इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे आखाती देशांमधून जगभरात होणारा तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. पाकिस्तानची तर अतिशय वाईट अवस्था आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाल्यानं पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आता हा हल्ला नेमका पाकिस्तानच्या तेल रिफायनरीवरच करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये पारिस्तानचं मोठं नुकसान झालं असून, पुन्हा एकदा देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तानच्या दरिग्वान परिसरात असलेल्या नॅशनल रिफायनरी लिमिटेडच्या प्लांटवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अचानक काही बंदुकधारी लोक रिफायनरी परिसरात घुसले आणि त्यांनी आंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अचानक गोळीबार सुरू झाल्यानं या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

मात्र या हल्ल्यामध्ये तेल रिफायनरीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नक्की किती नुकसान झालं याची माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने घटनास्थळी क्लियरंस ऑपरेशन सुरू केलं. क्लियरंस ऑपरेशन सुरू होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला? कशासाठी केला याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून अजून याची जबाबदारी घेण्यात आलेली नाही. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आता पाकिस्तान सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. सर्व परिसरात नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू झाला आहे. या हल्ल्यामुळे चांगलीच दहशत पसरली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रेग्नेंसीची खबर मिळताच दीपिका पादुकोणला मोठा धक्का? चाहत्यांचाही संताप अनावर; नेमकं काय घडलं?
  • ट्रम्प यांनी गरळ ओकली! पण अमेरिकेच्या या नेत्याने जिंकलं मन, म्हणाला, मी राष्ट्रपती बनलो तर भारतासोबत…
  • MI vs CSK Live Updates, IPL 2026 : मुंबई-चेन्नईत टफ फाईट, वानखेडेत कोण जिंकणार?
  • पूरनची विकेट काढताच रवींद्र जडेजाने खिशात हात घातला, विचित्र सेलिब्रेशनचा सामन्यानंतर केला खुलासा
  • रोमँटिक सीनदरम्यान अभिनेत्रीच्या तोंडातून येत होता दुर्गंध, सहन न झाल्याने अभिनेत्याने केलेली दिग्दर्शकाकडे तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in