
Deepika Padukone : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने नुकतेच आपल्या चहत्यांना खुशखबर दिली आहे. ती लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या मुलीच्या हातात प्रेग्नेंसी किट असलेला फोटो पोस्ट करत तिने ही खुशबखर दिली आहे. दीपिका आई होणार असल्याने तिच्या चाहत्यांना तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या प्रग्नेंसीचे हे दिवस दीपिका खूप एन्जॉय करत आहे. असे असतानाच तिच्याबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या दाव्याची देशभरात चर्चा सुरू झाल्यानंतर यावरह स्पष्टीकरणही समोर आले आहे.
दीपिकाच्या बाबतीत नेमका काय दावा केला जातोय?
दीपिका पादुकोण हिचा लवकरच राका नावाचा चित्रपट येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्त्य अभिनेताही प्रमुख भूमिकात झळकणार आहे. हा सिनेमा बिग बजेट असून निर्माते त्यावर तब्बल 800 कोटी रुपये गुंतवत आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण हिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. परंतु याच भूमिकेबाबत अनेक दावे केले जात आहेत. दीपिका पादुकोणचा या चित्रपटातील स्क्रिन टाईम कमी करण्यात आलेला आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु यावरच आता निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दीपिकाचा स्क्रिन टाईम कमी केलेला नाही
दीपिका पादुकोण हिच्या रोलविषयी दावे केले जात असतानाच निर्मात्यांनी समोर येत या फक्त अफवाच आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटातील दीपिकाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. तिचा स्क्रिन टाईम कमी करण्यात आलेला नाही, असेही निर्मात्यांनी सांगितले आहे.
चित्रपटात कोण कोण असणार?
दरम्यान या चित्रपटात दीपिका पादुकोण हिच्यासोबतच रश्मिका मंदाना, मृणाल ठाकूर या अभिनेत्रीदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट 2027 साली प्रदर्शित केला जाणार आहे. संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटाची कथा ही सायफाय आणि थ्रिलर असेल असे सांगितले जात आहे. मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदानाची भूमिका काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. अटली हा प्रसिद्ध दिग्दर्शक या चित्रपटाला दिग्दर्शित करतोय.
Leave a Reply