• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : अभिषेक शर्मा पाकिस्तानच्या एका खेळाडूला रोज नुसता कानफटवतोय, पुढच्यावेळी बोलण्याआधी दहावेळा विचार करेल

April 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्ड कप सुरु असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. हा मोहम्मद अमीर मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी ठरला होता. “अभिषेक शर्माची बॅटिंग चालली तर चालली, नाही तर काही नाही. तो उत्तम फलंदाज नाहीय. हुशारीने गोलंदाजी केल्यास बॉलर त्याच्यावर वरचढ ठरु शकतो” असं मोहम्मद अमीर एका टीव्ही शो मध्ये अभिषेक शर्माबद्दल बोलला होता. त्यावेळी दुर्देवाने अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. संपूर्ण टी20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माची फलंदाजी चर्चेचा विषय बनली होती. त्याच्या धावा होत नव्हत्या. आक्रमक ओपनर ही त्याची जी ओळख आहे, त्याला अभिषेक शर्मा न्याय देऊ शकत नव्हता.

टी20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा दोन महत्वाच्या इनिंग खेळला. एक झिम्बाब्वे विरुद्ध आणि दुसरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात नेट रनरेट सुधारण्यासाठी भारताला मोठा विजय आवश्यक होता. त्यावेळी अभिषेकने 30 चेंडूत 55 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 256 धावांचा डोंगर उभारला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा दुसरा हायेस्ट स्कोर आहे. भारताने हा सामना जिंकला.

स्लॉगर असा खेळतो का?

फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध महत्वाच्या सामन्यात अभिषेक 21 चेंडूत 52 धावांनी खेळी खेळला. भारताने 255 धावा करुन हा सामना सुद्धा जिंकला. फायनलमध्ये भारताने 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या या दोन इनिंग म्हणजे अमीरच्या तोंडावर चपराक होती. अभिषेक शर्माने मोहम्मद अमीरच्या कानशि‍लात लगावण्याचा सुरु केलेला हा सिलसिला अजूनही कायम आहे. आता आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेक शर्मा जबरदस्त प्रदर्शन करतोय. SRH चे आतापर्यंत सात सामने झालेत. त्यात चार मॅचमध्ये अभिषेकने टॉप परफॉर्मन्स दिलाय. एक सेंच्युरी, दोन फिफ्टी आणि 48 धावांची खेळी. जो स्लॉगर आहे, ज्याच्या बॅटला बॉल लागला तर लागतो तो असा खेळतो का? मोहम्मद अमीरने पुढच्यावेळी बोलण्याआधी दहावेळा विचार करावा.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • स्वता:चा चित्रपट बघताना झोपलेला हा निर्माता, तरीही चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, थिएटरबाहेर व्हायची प्रचंड गर्दी
  • Up Election 2027 : उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मोठी घोषणा, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर
  • आयपीएल 2026 स्पर्धेत 1.60 कोटीत विक्री झालेल्या खेळाडूवर चप्पल घालून खेळण्याची वेळ, कारण की…
  • IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की..
  • Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षातील या नेत्याच्या मुलाला संधी मिळणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in