• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डेब्यू करताच चमकलं हिचं नशीब, 28 व्या वर्षी बनली सुपरस्टारची गर्लफ्रेंड – पत्नी आणि आई..!

April 23, 2026 by admin Leave a Comment


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूत बंगला'चित्रपटामध्ये जिसू सेनगुप्ता यांनी अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, जे त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहेत. अभिनयाच्या नावाखाली, वयाने लहान असलेल्या नायिका अनेकदा वयातल मोठे अंतर असूनही हिरोची प्रेयसी, किंवा पत्नीची भूमिका साकारतात. अगदी कधीकधी नायिका या ( हिरो मोठा असूनही) त्याच्या आईची भूमिका करताना दिसतात. आज आपण एका अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल जाणून घेणा आहोत, जिने वयाच्या 28 व्या वर्षी एका सुपरस्टारची प्रेयसी, पत्नी आणि आईची भूमिका साकारली आहे. ( All Photos : Google/ Social Media)

फिल्म इंडस्ट्रीत काहीही शक्य आहे. एका पिक्चरमध्ये नायकासोबत गाणं गाणारी नायिका, नंतर दुसऱ्या चित्रपटात त्याच हिरोसोबत आई, बहीण, वहिनी किंवा इतर भूमिकांमध्येही दिसली आहे. अशीच एक अभिनेत्री होती, जिने अभिनेता महेश बाबूची आई, बहीण आणि प्रेयसीची भूमिका साकारली. ती कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ?

ती सुंदर अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नव्हे तर अमिषा पटेल आहे. या सौंदर्यवतीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एके काळी अमिषाने इंडस्ट्रीवर राज्य केले. 'कहो ना प्यार है' या तिच्या पहिल्याच चित्रपटाने ती रातोरात स्टार बनली. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने तेलुगू चित्रपटसृष्टीतही काम केलं होतं.

पुरी जगन्नाथ यांनी अमिशा पटेलला टॉलीवूडमध्ये आणले. 'बद्री' या चित्रपटाने अमिशाने तेलुगू प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात अमिशा पटेलसोबत रेणू देसाई होत्या. तिने 'सरयू'च्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटात पवन कल्याणसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला, ज्यामुळे अमिशा पटेलचे तेलुगू चित्रपटसृष्टीत मोठं स्वागत झाले.

या चित्रपटानंतर अमिषा पटेलची लोकप्रियता गगनाला भिडली. ती तेलगू चित्रपटसृष्टीत एक खळबळ माजवेल, असं सर्वांना वाटत होतं. पण काही अज्ञात कारणामुळे, ती जवळपास चार वर्षे कोणत्याही तेलगू चित्रपटात दिसली नाही. 'नानी' या चित्रपटाद्वारे तिने पुनरागमन करेपर्यंत प्रेक्षक तिला जवळजवळ विसरूनच गेले होते.

एस. जे. सूर्या दिग्दर्शित 'नानी' हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही, मात्र करीही तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात अमिशा पटेलने महेश बाबूच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. पुढे ते दोघे लग्न करून पती-पत्नी बनतात.

मात्र याच नानी चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ज्युनियर महेश बाबूचा जन्म होतो. शेवटच्या दृश्यात, अमिशा पटेल महेश बाबूच्या आईच्या भूमिकेत दिसते. अशाप्रकारे, एकाच चित्रपटात अमिशा पटेलने महेश बाबूची गर्लफ्रेंड, पत्नी आणि आई अशा भूमिका साकारल्या. त्यावेळी अमिशा आणि महेश दोघेही 28 वर्षांचे होते आणि आता दोघेही 50 वर्षांचे आहेत. या चित्रपटानंतर, अमिशा पटेलने 'नरसिंहुडू'मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत काम केले, ज्यात तिने सुब्बुलक्ष्मीची भूमिका साकारली.

याशिवाय अभिनेत्री अमिषा पटेलने बालकृष्णसोबतही काम केले आहे. दासरी नारायण राव दिग्दर्शित 'परमवीर चक्र' या चित्रपटात तिने नायिकेची भूमिका साकारली होती, पण हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. यानंतर तिने इतर कोणत्याही तेलुगू चित्रपटात काम केले नाही. हे सोडलं रत अमिषा पटेलने अनेक हिंदी चित्रपट केले आहेत. 'गदर' आणि 'गदर 2' सारख्या चित्रपटांनी तिला हिंदीमध्ये स्टार नायिका बनवलं. मात्र सध्या ती मोठ्या प़डद्यावर फार ॲक्टिव्ह दिसत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रेग्नेंसीची खबर मिळताच दीपिका पादुकोणला मोठा धक्का? चाहत्यांचाही संताप अनावर; नेमकं काय घडलं?
  • ट्रम्प यांनी गरळ ओकली! पण अमेरिकेच्या या नेत्याने जिंकलं मन, म्हणाला, मी राष्ट्रपती बनलो तर भारतासोबत…
  • MI vs CSK Live Updates, IPL 2026 : मुंबई-चेन्नईत टफ फाईट, वानखेडेत कोण जिंकणार?
  • पूरनची विकेट काढताच रवींद्र जडेजाने खिशात हात घातला, विचित्र सेलिब्रेशनचा सामन्यानंतर केला खुलासा
  • रोमँटिक सीनदरम्यान अभिनेत्रीच्या तोंडातून येत होता दुर्गंध, सहन न झाल्याने अभिनेत्याने केलेली दिग्दर्शकाकडे तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in