• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पत्नीवर संशय, साडीवरून झगडा… 30 वर्ष दोन राज्याच्या पोलिसांचा तपास; एक फोन आला अन्… काय आहे प्रकरण?

July 30, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील सिनेमे पाहिले असतील. या सिनेमांमध्ये खरा गुन्हेगार कोण हे शेवटपर्यंत कळत नाही. पूर्ण सिनेमा पाहताना प्रत्येकवेळी आपल्याला दुसरीच व्यक्ती गुन्हेगार वाटू लागतो. आणि शेवटी मात्र रहस्यावरचा पडद्या उघडतो. मुंबईतही असाच काहीसा गुन्हा घडला. घटना 30 वर्षापूर्वीची आहे. केवळ एका साडीसाठी गुन्हा घडला होता. दोन राज्यांचे म्हणजे दिल्ली आणि मुंबईचे पोलीस मारेकऱ्याचा 30 वर्ष शोध घेत होते. काहीच सुगावा लागत नव्हता. गुन्हाच असा शातिर पद्धतीने करण्यात आला होता. पण 30 वर्षानंतर एक फोन खणखणला अन् पोलिसांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं.

दिल्ली आणि मुंबईचे पोलीस 30 वर्ष सख्खे भाऊ असलेल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना पकडल्यानंतर पोलिसांना मोठी माहिती हाती लागली. या दोघांकडून मिळालेली माहिती दोन राज्यातील खुनाशी संबंधित होती. आरोपी फिरासत अली आणि शाहनवाज या दोघांना नुकतेच दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली. दोन्ही भावांना 1996मधील दिल्लीच्या कपडा व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. पण जामीन मिळाल्यावर दोघे फरार झाले होते. चौकशीत त्यांचा 2006मध्ये मुंबईत झालेल्या हत्येत समावेश असल्याचं समोर आलं. त्यांनी या हत्याकांडातील मृतदेहाचे तुकड्यांची विल्हेवाट लावली होती.

14 मे 2006 आणि भेंडी बाजार

या घटनेची सुरुवात 14 मे 2006 रोजी मुंबईच्या भेंडी बाजारातील मटन मार्केटमधून झाली होती. सकाळी एका फेरिवाल्याला त्याच्या ठेल्यावर एक प्लास्टिकची बॅग सापडली. त्यात डोकं आणि हातपायापासून वेगळे करण्यात आलेलं मानवी शरीर होतं. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी आव्हान होतं. कारण शरीराचे बाकी अवशेष गायब होते. डीएनए चौकशी आणि बेपत्ता लोकांचं रेकॉर्ड शोधल्यानंतरही पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. त्यानंतर अनेक वर्ष प्रकरण तसंच थिजत राहिलं.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट नुसार, तब्बल एका दशकानंतर खबऱ्याच्या एका सूचनेमुळे या प्रकरणाला नवीन दिशा मिळाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत व्यक्तीची ओळख पटली. किशन खारवा यांचा मृतदेह असल्याचं समोर आलं. पोलिसांनी किशनची पत्नी बंसीबेनची चौकशी केली. त्यावेळी तिने पतीच्या हत्येसाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, किशन खूप दारू प्यायचा. पत्नीला मारहाण करायचा. तिच्याशी दुर्व्यवहार करायचा. तिच्यावर संशय घ्यायचा. फिरासत अली आणि त्याच्या साथीदाराने किशनची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याचा आरोप आहे.

30 वर्षानंतर…

चौकशी सुरू असताना फिरासत अली हा दिल्लीतील एका जुन्या हत्या प्रकरणात दोषी असल्याचं समोर आलं. हे प्रकरण 27 सप्टेंबर 1996चं होतं. पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगरमध्ये जुन्या कापड बाजारात व्यवसायावरून वाद झाला होता. त्यात कपडा व्यापारी इश्तियाक अहमदची चाकू मारून हत्या करण्यात आली होती. साडी खरेदीवरून दोघात वाद झाला होता. तेव्हा शाहनवाजने धमकी दिल्यानंतर काही तासात त्याचा भाऊ फिरासत आणि त्यांचे इतर साथीदार आले होते.

त्यांनी इश्तियाकच्या खोलीत जाऊन त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी कोर्टाने फिरासत आणि शाहनवाज यांना जन्मठेप सुनावली. 2000मध्ये या दोघांनी अपील केल्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. पण त्यानंतर दोघे फरार झाले. 2016मध्ये दिल्ली कोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. पण दोघांनी आत्मसमर्पण केलं नाही.

अन् पकडले

मुंबई हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतरही फिरासतला 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर तो फरार झाला. नुकतीच दिल्ली पोलिसांच्या अँटी रॉबरी अँड स्नॅचिंग सेलला दोन्ही भावांची खबर लागली. त्यानंतर वेगवेगळ्या टीम तयार करून उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि झारखंडच्या गोड्डा येथे छापेमारी करण्यात आली. कारण आरोपींनी दुसऱ्यांना सतर्क करू नये म्हणून. दोघांना त्यांच्या ठिकाण्याहून अटक करण्यात आली.

हे दोघेही भाऊ सामान्य माणसासारखे जगत होते. जुना कापड व्यवसाय करत होते. फिरासत तेलंगना आणि आंध्र प्रदेशात मालाचा पुरवठा करायचा. तर शाहनवाज हा झारखंड आणि महाराष्ट्रातील कारभार पाहत होता. आता दोघांनाही तिहार तुरुंगात ठेवलं आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना दोघांच्या अटकेची माहिती दिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in