• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नोकरी गेली तरी नो टेन्शन! सरकारी तिजोरीतले हजारो रुपये येणार कामी; वाचा तुमचे पैसे कसे काढायचे?

August 29, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येक महिन्याला तुमचा पगार होताच पैसे कसे खर्च झाले हे तुम्हालाच कळत नसेल तर केवळ जास्त कमाई करणे उपयोगाचे नाही. आर्थिक रुपाने मजबूत होण्यासाठी कमाई सोबतच पैशांची योग्य प्रकारे बचत करणे, खर्च करणे आणि गुंतवणूक करणे देखील गरजेचे आहे. जर तुम्ही दीर्घकाळात संपत्ती वाढवू इच्छीत असाल तर काही आर्थिक सवयी जीवनात भाग बनवाव्या लागतील. या सवयी तुम्हाला अचानक येणाऱ्या खर्चासह भविष्यासाठी मजबूत आधार देखील देऊ शकतील.

पहिला नियम –

पहिला नियम तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. नोकरी गेली, मेडिकल इमर्जन्सी वा अचानक मोठा खर्चाच्या स्थिती हा इमर्जन्सी फंड मदतीला येतो. आर्थिक तज्ज्ञ सल्ल्यानुसार इमर्जन्सी फंड आवश्यक मासिक खर्चाच्या सुमारे ३ ते ६ महिन्याएवढी रक्कम सहज उपलब्ध होणाऱ्या खात्यात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देतात.ही रक्कम आपात्कालिन स्थितीत वापरता येते.

दुसरा नियम –

नियमित वेतन होताच आधी बचत करावी. नेहमी लोक महिन्याच्या शेवटी वाचलेले पैसे सेव्ह करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तोपर्यंत बहुतांशी रक्कम संपते. या ऐवजी पगार येताच एक निश्चित रक्कम आपल्या सेव्हींग वा गुंतवणूक खात्यात ऑटोमेटिक ट्रान्सफर करावी. यामुळे बचती सवय लागेल. आणि अनावश्यक खर्च टाळला जाईल.

तिसरा नियम –

तिसरा नियम म्हणजे सर्व खर्चाचा हिशेब चोख ठेवणे, रोज होणारे छोटे-मोठे खर्च महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम बनू शकतात. मोबाईल एप्स, स्प्रेडशीट वा साध्या डायरीत खर्च लिहिल्याने तुम्हाला कळेल की पैसा कशावर जास्त खर्च होत आहे. अनावश्यक सब्सक्रिप्शन, वारंवार बाहेर जेवणे, छोटी-छोटी ऑनलाईन खरेदी कमी केली जाऊ शकते.

चौथा नियम –

चौथा नियम क्रेडिट कार्डला योग्य समजदारीने वापरणे, क्रेडिट कार्ड सुविधा देते. मात्र याला अतिरिक्त कमाई समजणे महागात पडू शकते. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करु नका. आणि दर महिन्याला संपूर्ण बिले दिलेल्या तारखेला भरली जातील याची काळजी घ्या, त्यामुळे महागड्या व्याजापासून वाचण्यास मदत मिळते.

5 वा नियम –

गुंतवणूक कमी वयात सुरु केली तर कम्पाऊंडिंग तेवढी ( चक्रवाढ व्याज ) मिळते. दीर्घकाळाच्या लक्ष्यांसाठी कमी खर्चाच्या इंडेक्स फंड सारख्याचा पर्यायाचा विचार केला जावा.परंतू गुंतवणूक नेहमी तुमचे लक्ष्य, जोखीम उचलण्याची क्षमता आणि काळानुसार केली पाहिजे. शेअर बाजाराशी संबंधीत गुंतवणूकीत जोखील देखील मोठी असते. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.

सहावा नियम –

सहावा नियम आपल्या कमाईवर लक्ष्य देणे आहे.केवळ खर्च कमी करण्यासही देखील मर्यादा असतात. परंतू तुमची कमाई वाढण्याची क्षमता दीर्घकाळात जास्त होऊ शकते.नवीन स्कील शिकणे, स्कीलवरील खर्चाला खर्च न मानता भविष्यासाठीची गुंतवणूक मानावे.

7 वा नियम –

सातव्या नियमानुसार स्वत:च्या पगारावर बोलणे. तुमच्या पगाराचा परिणाम केवळ आजच्या कमाईवर नाही, तर बोनस, भविष्यातील बचत आणि निवृत्ती योगदानावर देखील पडू शकतो.तुमच्या व्हॅल्यूला आत्मविश्वासाने समोर ठेवून उचित आणि बाजारानुसार वेतनाची मागणी करा. या सात सवयींनी हळूहळू तुम्हाला आर्थिक शिस्त लागून दीर्घकाळात चांगले आर्थिक भविष्य बनवण्यास मदत मिळते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..
  • मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
  • लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
  • नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
  • ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’मधील काश्मीरी पंडितांवरील वक्तव्यावरून समय रैनावर टीका; राम कदम आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in