• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!

June 24, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘मिंदे’ असा उल्लेख करत टीका केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना “लायकीत राहून बोलावे” असा सल्ला दिला होता.

दरम्यान, निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले, “निलेश राणेंनी इतरांना लायकी शिकवण्यापूर्वी स्वतःची लायकी पाहावी. त्यांना राजकारणात ओळख आणि स्थान शिवसेनेनेच दिले आहे. त्यामुळे बोलताना त्यांनी तोंडावर नियंत्रण ठेवावे.”

पुढे बोलताना महेश सावंत यांनी निलेश राणे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. “निलेश राणेंची लायकी काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी इतरांवर टीका करताना शब्दांची मर्यादा पाळावी,” असा टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे, निलेश राणे आणि आता महेश सावंत यांच्या वक्तव्यांमुळे दोन्ही शिवसेनांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून, आगामी काळात हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मारेकऱ्यांच्या तोंडी एकच नाव, विलास घुले प्रकरणात हादरवून टाकणारे पुरावे, रमेश घुले सगळं बाहेर काढणार!
  • Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…
  • तेव्हा मी मुंडे साहेबांचे 10 मिनीटं पाय धरले, अन् आज…, विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे आक्रमक, मागचं सगळंच सांगितलं…
  • लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
  • Mumbai : लोकलमधील हत्येप्रकरणी जीआरपीची मोठी कारवाई, आरोपी रोशन सुवर्णाला घेतले ताब्यात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in