• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना रणवीर, ना शाहरुख, 55 वर्षांपासून ‘या’ अभिनेत्याचा कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड, नाव ऐकूनच लोक…

July 18, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने आणि स्टारडमने एक सुवर्णकाळ गाजवला. 18 जुलै 2012 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजही त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला असा विक्रम, जो तब्बल 55 वर्षांनंतरही कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही.

राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेते आहेत, ज्यांनी 1969 ते 1971 या काळात सलग 17 हिट चित्रपट देण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या प्रचंड यशामुळे ते त्या काळातील सर्वात मोठे सुपरस्टार ठरले. त्यांच्या आधी कोणत्याही अभिनेत्याने असा विक्रम केला नव्हता आणि आजही हा विक्रम अबाधित आहे.

या विक्रमाची सुरुवात 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या सुपरहिट चित्रपटापासून झाली. त्यानंतर ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘डोली’, ‘इत्तेफाक’, ‘खामोशी’, ‘सफर’, ‘द ट्रेन’, ‘कटी पतंग’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘आनंद’, ‘मर्यादा’, ‘हाथी मेरे साथी’, ‘अंदाज’ आणि ‘छोटी बहू’ या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं.

अनेकांनी प्रयत्न केले, पण विक्रम कायम

1971 मध्ये नोंदवलेला हा विक्रम 2026 पर्यंत, म्हणजेच तब्बल 55 वर्षांनंतरही, कोणीही मोडू शकलेला नाही. अनेक दिग्गज कलाकारांनी या विक्रमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राजेश खन्नांचे जावई आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी सलग 12 हिट चित्रपट दिले आहेत. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांनी प्रत्येकी सलग 11 हिट चित्रपटांचा टप्पा गाठला. सलमान खानने सलग 10 हिट चित्रपट दिले, मात्र राजेश खन्नांचा विक्रम अद्याप कायम आहे.

राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये ‘आखिरी खत’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चाहत्यांमध्ये ते प्रेमाने ‘काका’ या नावाने ओळखले जात. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की, त्या काळात ‘ऊपर आका, नीचे काका’ ही म्हण प्रचंड गाजली होती.

2012 मध्ये घेतला अखेरचा श्वास

18 जुलै 2012 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी मुंबईत राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक युगपुरुष गमावला. आजही त्यांच्या अभिनयाची जादू, सुपरस्टारडम आणि त्यांनी निर्माण केलेले विक्रम चाहत्यांच्या मनात कायम आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in