• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागपूरच्या महिलेने 1 लाखांची सुपारी देऊन नवऱ्याला संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

July 5, 2026 by admin Leave a Comment


नागपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरमध्ये 37 वर्षीय पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश बोरकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरातील दररोजच्या वादाला कंटाळून बायकोने नवऱ्याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीत साखरेला अटक केली आहे. तसेच इतर 2 शूटरला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

नागपूरच्या भांडेवाडी 2 जुलै रोजी ही हादरवणारी घटना घडली. 45 वर्षीय गणेश बोरकर हा त्यादिवशी भांडेवाडी भागात चहाचं दुकानावर गेले होते. चहा पिऊन घरी परतत असताना त्याला हल्लेखोरांनी घेरलं. त्यानंतर हल्लेखोरांनी गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. तर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

गणेशची हत्या झाल्यानंतर त्यांच्य आईने भांडेवाडी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रँच पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी साक्षीदार, मोबाइल लोकेशन आणि सूत्रांच्या माहितीच्या आधाराने तपास सुरू केला. या तपासात पोलिसांना गणेशच्या पत्नीवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पत्नी मनिषाने गुन्हा कबुल केला. तिने पोलिसांना सांगितले की, ‘मी अनेक दिवसांपासून पती आणि मुलांपासून वेगळी राहत होती. घरात आमचे दररोज वाद व्हायचे. या वादाला कंटाळून आरोपी अभिजीत साखरेशी संपर्क साधला’.

गणेश बोरकरच्या हत्येसाठी 1 लाखांचा सौदा झाला होता. पत्नी मनिषाने आगाऊ रक्कम म्हणून अभिजीतला 50 हजार रुपये दिले होते. तर उर्वरित रक्कम हत्या झाल्यानंतर देण्याचे कबुल केले होते. पोलिसांनी आणखी खोचक प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याने मनिषाने नवऱ्याच्या हत्येची कबुली दिली. गणेश बोरकरच्या विरोधातही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तरीदेखील त्याची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी आरोपी पत्नी मनीषा आणि अभिजीत साखरेला तुरुगांत धाडलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in