
शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसैनिकांना कोणत्याही धमक्या किंवा दबावाला बळी न पडता, नेटाने पक्षाचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. निधी वाटपातील गैरव्यवहार आणि पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील दडपण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काय यांचे घरचे पैसे देतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. म्हेत्रे यांनी शिवसैनिकांना संघटित होऊन दडपशाहीविरोधात आवाज उचलण्याचे निर्देश दिले. “आम्ही आयुष्यभर शिवसेनेसारखेच वागलो, पण आता आम्हालाच टार्गेट केले जात आहे,” असे ते म्हणाले.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच अनेकांनी राजकीय यश मिळवले, याची आठवण करून देत, आता अन्याय सहन न करण्याची भूमिका त्यांनी मांडली. गोगावले साहेबांना न्याय मिळवून देण्याची विनंती करताना, शिवसैनिकांचा संताप वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट हे आपल्यासाठी नवीन नाही, असे म्हणत येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवसेनेचेच नेतृत्व राहील आणि व्याजसहित परतफेड करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply