
स्वपनील उमप, प्रतिनिधी : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. पहाटे 3.30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. अनेक बालकांचा जीव वाचवता आला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 39 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. आग लागल्या बरोबर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर / नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. 6 बालकांना सुपर स्पेशालिटी दाखल करण्यात आले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply