• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोघं एकाच व्हॅनिटी व्हॅनमध्ये, मी दार उघडणार इतक्यात..; सनी देओल-डिंपल कपाडियाबद्दल नवा खुलासा

July 31, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये एकेकाळी अभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. या दोघांनी एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चाहत्यांना खूप आवडायची. पण त्याचसोबत त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा सेटवर चर्चेचा विषय बनायची. चित्रपटात काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी सनी विवाहित होता. सनी आणि डिंपल यांनी त्यांचं नातं कधीच उघडपणे मान्य केलं नसलं तरी वेळोवेळी अनेक दावे समोर आले आहेत. आता ज्येष्ठ सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी त्यांच्या कथित रिलेशनशिपबद्दल एक किस्सा सांगत जुन्या गॉसिपला पुन्हा एकदा हवा दिली आहे.

व्हॅनिटी व्हॅनचा किस्सा

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योती व्यंकटेश यांनी असा दावा केला आहे की, इंडस्ट्रीत असे अनेक रिलेशनशिप्स आहेत, जे सर्वांना माहीत असतात, पण त्यावर उघडपणे चर्चा केली जात नाही. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं की, एकदा त्या सनी देओलची मुलाखत घेण्यासाठी कमलिस्तान स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडणार इतक्यात सनीच्या असिस्टंटने त्यांना थांबवलं. त्यानंतर ज्योती यांनी जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केली. तेव्हा सनी देओल व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आला आणि त्यांची माफी मागून सांगितलं की, त्यांना आणखी थोडा वेळ थांबावं लागेल. सनीने थांबायला सांगितल्यानंतर बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. तेव्हा ज्योती यांनी डिंपल कपाडिया यांना त्याच व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना पाहिलं होतं.

“डिंपल माझ्याकडे पाहून हसली आणि मला हाय-हॅलो बोलून तिथून निघून गेली. त्यानंतर सनीने मला आत मुलाखतीसाठी बोलावलं. जेव्हा मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले, तेव्हा सनीने मला सांगितलं की, तो एका प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होता, म्हणून त्याला वेळ लागला. मला सुरुवातीला असंच वाटलं होतं की दोघं कदाचित एखाद्या चित्रपटाची तयारी करत असतील. मात्र जेव्हा अशा कोणत्याही चित्रपटाची घोषणा झाली नाही, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, त्या दोघांमधील संबंध फक्त प्रोफेशनल नाही, तर त्यापेक्षा अधिक होतं. मी ऐकलेल्या अफवा खऱ्या होत्या”, असं त्या पुढे म्हणाल्या.

लंडनमधील सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोमध्ये दोघं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर बसलेले दिसले. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला होता. मात्र सनी देओल आणि डिंपल यांनी त्यांच्या नात्याला कधीच जाहीरपणे दुजोरा दिलेला नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in