• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दूध नव्हे तर विष पिताय? जास्त दूधासाठी म्हशींना बंदी असलेलं इंजेक्शन; FDA च्या कारवाईत धक्कादायक माहिती!

July 18, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अन्नपदार्थ केली जाणारी भेसळ, केमिकलयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या संस्था, कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत.

आतापर्यंत अनेक कंपन्या, दुकांनाचा परवानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे. विभागाच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, आता उल्हासनगरातून एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने उल्हासनगरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत म्हशींनी जास्त दूध द्यावे म्हणून बंदी असलेले इंजेक्शन दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

म्हशींनी जास्त दूध द्यावे म्हणून म्हशींना जादा दूधासाठी ऑक्सिटोसीनचा डोस दिला जात होता. एफडीएने छापामेरी केल्यावर उल्हासनगरात संबंधित ठिकाणी तब्बल 612 ऑक्सिटोसीनचे इंजेक्शन सापडले आहेत. हे इंजेक्शन प्रतिबंधित आहेत.

दरम्यान, आपण एकदम शुद्ध म्हणून जे दूध खातो, ते खरंच शुद्ध आहे का? म्हशींना इंजेक्शन देऊन जास्त दूध उत्पादन केले जात असेल तर ते दूध आरोग्यासाठी किती सुरक्षित असाही, सवाल उपस्थित केला जातोय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in