
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात देशातील अनेक भागातील दळणवळण विस्कळीत झालं आहे. वाहतूक ठप्प आहेत. अनेक गावात अजूनही वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हजारो लोक या महापुरात बेपत्ता झाले आहेत. चार दिवस झाले तरी त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इतर देशाचे नागरिकही नेपाळमध्ये बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील काही लोकही नेपाळमध्ये अडकले आहेत. नागपूरच्या एका महिलेची काठमांडूत तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला आहे. या कुटुंबीयांनी महिलेला नागपूरला एअर अॅब्युलन्सने आणण्याची मागणी केली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींकडे त्यांनी मागणी केली आहे.
नागपूरच्या निर्मला पांडे या महिला पर्यटकाची काठमांडूमध्ये तब्येत खूप बिघडल्यानंतर निर्मला पांडे यांना काठमांडू येथील “शहीद गंगा लाल नॅशनल हार्ट केअर इन्स्टिट्यूट” मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. काहीही करा. पण त्यांना एअर अॅम्बुलन्स नागपूरात आणा, अशी विनवणी या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
106 जणांचा समूह नेपाळला
निर्मला पांडे या नागपुरातून काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेल्या होत्या 106 जणांचा जो समूह नेपाळला गेला, त्यात निर्मला पांडेही होत्या. या 106 जणांपैकी 4 जण दिल्ली मार्गे नागपूरला परतले असून सुमारे 100 जण पाटणा – नांदेड एक्सप्रेसमधून नागपूरकडे निघाले आहेत. तर निर्मला पांडे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्यासोबत त्यांचा नातू आदित्य पांडे थांबलेला आहे.
एन्जिओप्लासिटीची गरज
पांडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे निर्मला पांडे यांना एअर ॲम्बुलन्सने नागपुरात आणण्याची विनंती केली आहे. निर्मला पांडे यांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर तातडीने एन्जिओप्लासिटी करण्याची गरज आहे. मात्र त्यांचा शुगर लेवल खूप जास्त वाढल्यामुळे काठमांडू येथील रुग्णालयात सध्या एन्जिओप्लासिटी करण्यात आलेली नाही. निर्मला पांडे यांना लवकरात लवकर नागपुरात आणण्यात महाराष्ट्र सरकारने मदत करावी, अशी मागणी पांडे कुटुंबीयांनी केली आहे.
सीईओ बेपत्ता
दरम्यान, इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे (Infosys Public Services) सीईओ लक्ष गोपीसेट्टी (Lax Gopisetty)यांच्यासहीत कर्नाटकातील 17 लोकही गायब आहेत. त्यांचा काहीच शोध लागत नाहीये. यातील काही लोकांचं लोकेशन माहिती पडल्याने कर्नाटक सरकार त्यांची माहिती देणार आहेत. त्यात सीईओ लक्ष गोपीसेट्टी आहे की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कर्नाटकचे सीएम डीके शिवकुमार यांनी याबाबात प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार नेपाळमध्ये अडकलेल्या आणि नेपाळमध्ये ज्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये अशा लोकांचा शोध घेण्याचं काम करत आहे. आम्ही 24 तास या नागरिकांबाबतची माहिती मिळवण्याचं काम सुरू ठेवलं आहे. आम्ही 17 लोकांची माहिती मिळवली आहे. कर्नाटकातील अनेक लोक नेपाळला गेले होते. त्यातील काही लोकांचं लोकेशन समजून आलं आहे. बाकी लोकांची माहिती मिळालेली नाहीये. त्यांची माहितीही लवकरच मिळवण्यात येणार आहे. काही लोक संपर्कात आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत, असं डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केलं.
कुटुंबाशी कंपनीचा संपर्क
इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे प्रमुख गोपीसेट्टी हे खासगी कामासाठी नेपाळला गेले होते. नेपाळमध्ये जलप्रलय आल्यानंतर त्यांचा काहीच संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळचे संबंधित अधिकारी आणि एजन्सीच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्या गोपीसेट्टी यांच्या लोकेशनची माहिती घेत आहोत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही गोपीसेट्टी यांच्या कुटुंबाच्याही सातत्याने संपर्कात आहोत. त्यांना पाहिजे ती मदत केली जाणार आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.
Leave a Reply