• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोळे, नाका-तोंडातून रक्तस्राव, स्मिता पाटील यांचे अखेरचे क्षण होते अत्यंत त्रासदायक; जया बच्चन यांनी केलेली मदत

July 20, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री स्मिता पटील यांनी फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. करियरच्या उच्च शिखरावर असताना स्मिता यांच्या आयुष्यात मोठी घटना घडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जवळपास अडीच वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. स्मिता प्रेग्नेंट होत्या. रिपोर्टनुसार, स्मिता जेव्हा 7 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या, तेव्हा त्यांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील झालेला. त्यानंतर 28 नोव्हेंबर 1986 मध्ये स्मिता यांनी एका गोंडल मुलाला जन्म दिला. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. मुलाच्या जन्मानंतर स्मिता यांची प्रकृती गंभीर होत होती, पण त्यांनी स्वतःकडे कधी लक्ष दिलंच नाही.

रिपोर्टनुसार, मुलाच्या जन्मानंतर होणारं इन्फेक्शन स्मिता पाटील यांच्या शरीरात वाढलं होतं. तेव्हा डॉक्टर घरी यायचे आणि त्यांच्यावर उपचार करायचे. पण त्यांची प्रकृती इतकी गंभीर होत होती, कोणाला काही कळलंच नाही. तेव्हा स्मिता यांच्या आई त्यांच्यासोबत होत्या. 13 डिसेंबर रोजी राज बब्बर यांना एका मिटिंगसाठी बाहेर जायचं होतं, ते गेल्यानंतर डॉक्टर घरी आणि स्मिता यांना ड्रिप लावली. अभिनेत्रीला ताप होता आणि याच कारणामुळे 15 दिवस त्यांनी मुलाला स्वतःपासून दूर ठेवलं. तेव्हा स्मिता यांनी स्वतःच्या तापत्या शरिराला एक कपड्यात गुंडाळलं आणि मुलाला दूध पाजलं…

13 डिसेंबरच्या संध्याकाळी घरी परत्यानंतर राज यांना पुन्हा एका पार्टीसाठी जायचं होतं. त्यांच्यासोबत स्मिता यांना देखील जायचं होतं. पण राज बब्बर यांनी त्यांना घरी आराम करण्यासाठी सांगितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात अलं की, स्मिता यांचा चेहरा पिवळा पडत आहे. त्यानंतर काही वेळात त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. पण स्मिता रुग्णालयात जाण्यासाठी तयार नव्हत्या, कारण त्यांना मुलापासून दूर व्हायचं नव्हतं. पण प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काही वेळात स्मिता केमात गेल्या…

डोळ्यातून येऊ लागलं रक्त

रिपोर्टनुसार, जया बच्चन यांनी दिल्ली येथील एक ब्रिटिश न्यूरोसर्जन यांना बोलावण्यासाठी प्रयत्न केले. स्मिता यांचे डोळे, नाका – तोंडतून रक्त येऊ लागलं. त्या रक्ताच्या उलट्या करु लागल्या. डोळ्यातून रक्त येऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी देखील सर्व आपेक्षा सोडलेल्या. त्याच रात्री 12.55 मिनिटांनी स्मिता यांनी अखेरचा श्वास घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in