• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटुंब धोक्यात, अमेरिकेत हाहाकार, थेट इराणच्या IRGC कडून..

May 23, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धाचा जगाला वैताग आला. रशिया आणि युकेन युद्धाचा जगावर फार काही परिणाम झाला नाही. मात्र, इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने या युद्धाचे परिणाम जगावर दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. शिवाय जगात ऊर्जेचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची मागणी आहे. मात्र, स्थिती अधिक गंभीर होत आहे. युद्धविराम होत नाही, काही गोष्टींवर दोन्ही देश अडवून बसले आहेत. इराणवर हल्ला करण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना अजिबात वाटले नव्हते की, युद्ध इतके जास्त पेटेल. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला अजूनही काही यश आले नाही. यादरम्यानच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला टार्गेट करून हल्लाचा प्रयत्न झाला. याबाबतच आता जगाची झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित कटासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या तपास यंत्रणांनुसार, इराण समर्थित दहशतवादी नेटवर्कशी संबंधित एका संशयिताने इव्हांकाच्या हत्येचा कट रचला.  इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता हा कट रचण्यात आला. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार, 32 वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादीला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली.

त्यानंतर अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले. तपास यंत्रणांचा दावा आहे की, संशयिताकडे इव्हांका ट्रम्पच्या फ्लोरिडा येथील घराचा सर्व नकाशा आहे. जिथे ती तिचा पती जेरेड कुशनरसोबत राहते. अहवालानुसार, 2020 मध्ये बगदादमध्ये झालेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी मारले गेल्यानंतर संशयिताने ट्रम्प कुटुंबाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता.

या रिपोर्टनंतर मोठी खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. काही दिवसांकरिता युद्धसंधी लागू करण्यात आली. सध्या युद्धविरामाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, युद्धविराम होत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी धमकी इराणला दिली जात आहे. यादरम्यानच आता अमेरिकेत चांगलीच मोठी खळबळ उडालीये.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
  • US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
  • Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in