• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोंबिवलीतील शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, डॉक्टरांना मारहाण भोवली

July 8, 2026 by admin Leave a Comment


डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्स मारहाण केल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती. अशा प्रकारे डॉक्टरांना लोकप्रतिनिधी मारहाण करु लागले तर डॉक्टरांनी काम कसे करायचे असे म्हणत विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना अखेर विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मारहाण करणाऱ्या आरोपींच्या अडचणीत वाढ

रमेश पवार,  अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम अशी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांवर सरकारी कामकाजात अडथळा, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकराची कलमे लावण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांना विष्णू नगर पोलिसांनी  कल्याण कोर्टात हजर केले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे याला देखील अटक केल्याचे म्हटले आहे.

ओपीडी बंद ठेवून निषेध

डोंबिवलीत शास्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून निषेध आंदोलन सुरु केले होते. या प्रकरणात विधीमंडळात उबाठा सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि उबाठाचे खासदार विनायक राऊत यांनी शास्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांची बाजू जाणून घेतली.

काय आहे नेमके प्रकरण

डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या नवजात बाळाला उपचारासाठी NICU बेडची गरज होती. रुग्णालयातील सर्व बेड पूर्ण भरलेले असल्याने, ऑन-ड्यूटी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी सेवेतील डॉक्टरांना मारहाण करताना दिसत आहेत. 

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in