• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डिंपल कपाडिया यांनी घटस्फोटाच्या बदल्यात राजेश खन्नांपढे ठेवलेली मोठी अट, कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

July 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनाला आज अनेक वर्ष पूर्ण झाले आहेत, पण असं असताना देखील राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हा अभिनेते 31 वर्षांचे होते. लग्नानंतर डिंपल यांनी यशस्वी करियरचा त्याग केला आहे कुटुंबाकडे लक्ष केंद्रीत केलं. दोन मुलींची जबाबदारी त्यांनी फार कमी वयात पार पाडली. पण डिंपल आणि राजेश खन्ना यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… दोघे वेगळे राहत असले तर, दोघांचा घटस्फोट कधीच झाला नाही.

दरम्यान, राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंड अनीता आडवनी यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. अनीता यांनी सांगितल्यानुसार, राजेश खन्ना यांनी डिंपल यांच्याकडून 10 वेळा घटस्फोटाची मागणी केली. पण डिंपल यांनी त्यांच्यापुढे एक अट ठेवलेली. राजेश खन्ना यांच्या संपूर्ण संपत्तीवर डिंपल यांना हक्क हवा होता..

मुलाखतीती अनीता म्हणाल्या, ‘राजेश खन्ना यांनी डिंपल यांच्याकडून 10 वेळा घडस्फोट मागितला असेल. पण डिंपल यांनी त्यांच्यासमोर मोठी अट ठेवलेली होती. डिंपल यांची अशी मागणी होती की, ‘घटस्फोट हवा असेल तर, संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर करावी लागेल.’ ती प्रचंड गोंधळात अडकवणारी परिस्थिती होती…’, असं देखील अनीता म्हणाल्या.

राजेश खन्ना यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी त्यांचं अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत अफेअर होतं. राजेश खन्ना यांच्या मनावर मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रू यांचं राज्य होतं. एक दोन नाही तर, तब्बल सात वर्ष दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अंजू महेंद्रू यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी 16 वर्षीय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया दोन मुलींचे आई – बाबा झाले. दोन मुलींच्या जन्मानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in