• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डास अजिबात येणार नाहीत, जर तुमच्या घरात असतील ‘ही’ झाडे, जाणून घ्या झाडांची नावे काय?

June 28, 2026 by admin Leave a Comment


पावसाळा आला की डासांची मोठी समस्या निर्माण होते. ते दिवस-रात्र आपल्या कानाजवळ फिरून आपली शांतता भंग करतात. डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या धोकादायक आजारांचा धोकाही वाढवतो. जे आरोग्यासाठी घातक आहे . डासांना मारण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या रासायनिक कॉइल्स, अगरबत्ती आणि स्प्रेच्या वापरामुळे अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अनेकांना तर खोकला देखील होतो. मात्र, निसर्गाने आपल्याला कोणत्याही रसायनांचा वापर न करता नैसर्गिकरित्या डासांना दूर ठेवण्यासाठी अद्भुत वनस्पती दिल्या आहेत. आपल्या बाल्कनीत किंवा कुंड्यांमध्ये या वनस्पती लावून डासांना कसे दूर ठेवायचे ते आता जाणून घ्या…

तुळस: सहसा प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोप असते. धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, तुळशीचा सुगंध नैसर्गिक प्रतिबंधक म्हणून काम करतो आणि घरांपासून डासांना दूर ठेवतो.

लॅव्हेंडर: लॅव्हेंडरच्या रोपाचा सुखद सुगंध संपूर्ण घरात दरवळतो. मात्र, त्यातील नैसर्गिक तेलांमुळे डास अजिबात दूर राहत नाहीत. हे रोप मधमाशी आणि फुलपाखरांना आकर्षित करते, तर त्यांना दूर ठेवते.

लेमन बाम: पुदिन्याच्या कुळातील ही वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये असलेला सिट्रोनेला हा घटक डासांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. औषधोपचारात नैसर्गिक पर्याय म्हणूनही याचा वापर केला जातो.

रोझमेरी: याचा उपयोग केवळ स्वयंपाकातच नाही, तर डासांना दूर ठेवण्यासाठीही होतो. चांगल्या प्रकारे वाळलेल्या रोझमेरीच्या फांद्या जाळल्यावर येणाऱ्या सुगंधाने घरातील सर्व डास पळून जातात.

पुदिना: पुदिन्याचा तीव्र, उग्र वास अनेक प्रकारच्या कीटकांसाठी प्राणघातक असतो. जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीतील कुंड्यांमध्ये पुदिन्याचे रोप असेल, तर डास आणि इतर हानिकारक कीटक तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत.

लेमनग्रास: कीटकांना दूर ठेवण्यासाठी लेमनग्रास हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. त्याच्या लिंबूवर्गीय सुगंधामुळे डास त्या परिसरात अजिबात टिकू शकत नाहीत.

लसूण वनस्पती: डासांना लसणाचा तीव्र वास सहन होत नाही. कुंडीत लसूण वाढवल्यास त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी तसेच घराचे डासांपासून संरक्षण करण्यासाठीही होतो.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in