• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘टीवी इंडस्ट्री च्या आंटीज..’, हिना-रुबीनाच्या टोमण्यांमुळे भडकला आसिम रियाज,थेट म्हणाला..

September 3, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय मॉडेल, अभिनेता आणि रॅपर आसिम रियाज सध्या चांगलाच चर्चेत आहे. हिमांशी खुरानासोबतच्या वादामुळे आधीच चर्चेत असलेल्या आसिमने आता टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक आणि हिना खान यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आसिम चांगलाच भडकला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं. खरंतर रुबीना दिलैक आणि हिना खान या दोघींनी नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये आसिम रियाजच्या रिअॅलिटी शोजमधील भूमिकेवर भाष्य केलं होतं. या चर्चेची एक क्लिप पाहिल्यानंतर आसिमने X वर एक पोस्ट शेअर करत दोघींना टोला लगावला.

त्यावर उत्तर देताना आसिमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मी पॉडकास्टची एक क्लिप पाहिली, ज्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील आंटी-अंकल चर्चा करत होते की मी प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये टीआरपी आणतो. तर हो, मी आणतो. तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा आणि इंडस्ट्रीमध्ये कठपुतळी बनून आपापल्या भूमिका निभावत राहा’ असा टोमणा त्याने मारला.

काय म्हणाल्या होत्या रुबीना आणि हिना ?

खरंतर रुबीन दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे दोघे ‘द 4 पीओवी’ (The 4 POV) या नावाने एक पॉडकास्ट चालवतात. त्यामध्ये अभिनेत्री हिना खान आणि तिचा पती रॉकी यांच्यासोबत पब्लिसिटी, कॉन्ट्रोव्हर्सी आणि रिअॅलिटी शोजवर चर्चा केली. नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आसिम रियाजच्या त्या दाव्यावर चर्चा केली, ज्यामध्ये तो रिअॅलिटी शोजच्या यशात आणि टीआरपीमध्ये आपल्या योगदानाबद्दल बोलला होता.

हिना खानने या चर्चेदरम्यान आसिमच्या दाव्यावर आपलं मत व्यक्त केलं. त्या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाड़ी’ आणि ‘बैटलग्राउंड’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्ये आपल्या योगदानाबद्दल सांगितलं होतं. या रिअॅलिटी शोजना लोकप्रिय बनवण्यात आणि त्यांची टीआरपी वाढवण्यात त्याचा मोठा वाटा असल्याचं तो मानतो, असं हिनाने म्हटलं होतं.

मात्र या पॉडकास्टमधील या चर्चेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती आसिमच्या नजरेस पडली. त्यानंतर त्याने X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आणि रुबीना व हिना यांना टोला लगावला.

आसिम रियाज आणि रिअॅलिटी शोमधील इतर कलाकारांमधील मतभेद यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले होते. तर आता रुबीना दिलैक आणि हिना खान यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान
  • BB20 : ऑलिम्पिक मेडलिस्ट, ६ वेळा वर्ल्ड चँपियन.. शोमध्ये होणार बॉक्सिंग क्वीनची एंट्री!
  • चक्क कानशिलातच लावून केलं प्रपोज, अभिनेत्री थेट… ‘त्या’ सीनसमोर कबीर सिंग चित्रपट फेल
  • आता भारत संपवणार रशिया-युक्रेन युद्ध? भारताच्या भूमिकेची जगात चर्चा; नेमकं समोर काय आलं?
  • Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in