• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओचा तगडा प्लॅन! 1,032 GB डेटा मिळणार, हॉटस्टारपासून एआयपर्यंत सगळंच फ्री…

September 6, 2026 by admin Leave a Comment


रिलायन्स जिओने आपल्या 3,599 च्या वार्षिक प्रीपेड प्लॅनवर मेगा अॅनिव्हर्सरी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना आता 120GB अतिरिक्त हाय-स्पीड डेटा आणि 12 JioTV Pro पॅक वाउचर मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून, यामध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. याशिवाय जिओहॉटस्टारपासून, गुगल जेमिनी एआय प्रो आणि जिओ एआय क्लाऊड यांसारखे अतिरिक्त फायदेही दिले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वर्षभरात मिळणार 1,032.5GB पर्यंत डेटा

जिओच्या 3,599 च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच वर्षभरात एकूण 912.5GB डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSची सुविधाही आहे. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. मात्र, यासाठी 5G स्मार्टफोन, जिओ 5G नेटवर्क कव्हरेज आणि कंपनीच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अॅनिव्हर्सरी ऑफरमधून मिळणारा अतिरिक्त 120GB डेटा धरल्यास ग्राहकांना वर्षभरात एकूण 1,032.5GB पर्यंत डेटा मिळू शकतो.

दर महिन्याला 10GB बोनस डेटा

जिओ हा 120GB बोनस डेटा एकाच वेळी देणार नाही. तो 12 महिन्यांसाठी दर महिन्याला 10GB डेटा बूस्टर म्हणून दिला जाणार आहे. हा बोनस डेटा दररोज मिळणाऱ्या 2.5GB डेटापेक्षा वेगळा असेल. दर महिन्याला मिळणारा डेटा बूस्टर कसा अॅक्टिव्हेट करायचा आणि त्याची वैधता किती असेल, याची माहिती ग्राहकांना MyJio अॅपमध्ये मिळेल. या अॅनिव्हर्सरी पॅकेजमध्ये 12 JioTV Pro पॅक वाउचरही दिले जात आहेत. प्रत्येक वाउचरची किंमत 55 रुपये आहे. JioTV Proच्या माध्यमातून ग्राहकांना 1,000 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो.

गुगल एआय प्रोसह अनेक फायदे

जिओच्या 3,599 च्या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल + हॉलिवूड सब्सक्रिप्शन देखील मिळते. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने ज्या जिओ नंबरवरून रिचार्ज केला आहे, त्याच नंबरने JioHotstar मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे. याशिवाय ग्राहकांना 50GB Jio AI Cloud स्टोरेज मिळते. पात्र जिओ ग्राहक 18 महिन्यांचे Google AI Pro सब्सक्रिप्शन देखील क्लेम करू शकतात. जिओच्या माहितीनुसार, या सब्सक्रिप्शनची किंमत ₹35,100 आहे. यामध्ये प्रगत Gemini फीचर्ससोबत 5TB क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे.

इतकेच नाही तर EaseMyTripवर फ्लाइट बुकिंग करताना 2,200 रुपयांपर्यंतची बचत आणि AJIOवरील पात्र खरेदीवर 200 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. या ऑफरची उपलब्धता प्रत्येक मोबाइल नंबरनुसार वेगळी असू शकते. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी MyJio अॅप किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवर ऑफरची माहिती नक्की जाणून घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in