• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगेच्या लढ्याला मोठं यश, 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मंत्रालयात मराठा कक्षाची स्थापना होणार, मोठी घोषणा समोर

September 2, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार असून पहिले प्रमाणपत्र मनोज दादांच्या हातातून देणार असल्याची घोषणा केली. तसेच मंत्रालयात मराठा कक्षाची स्थापना होणार असल्याचीही माहिती लाड यांनी दिली आहे.

तुमच्या मनात जे आहे तेच होणार – लाड

प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लाड यांनी म्हटले की, ‘दादा, मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय उपोषण करु नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मलाही झोप लागली नाही. डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनाशी बोलायचे नव्हते. त्यांच्या मोठ्या भावाच्या रुपाने आलो आहे.

मंत्रालयात कक्ष स्थापन होणार

पुढे बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमंध्ये नोंदी लावल्या जाणार आहेत. जिल्हानिहाय पेन ड्राईव दिले आहेत. आपण 6 कोटी मराठे आहोत. आपण कमी नाही आहोत. अर्जदारांनी फक्त अर्ज करायला पाहिजे. अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळणार? जिल्हानिहाय नोडल ऑफिसर नेमला आहे. मंत्रालयातही कक्ष स्थापण करत आहोत. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हातातून देणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या मागे उभे आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope : 7 सप्टेंबरनंतर 3 राशींच्या आयुष्यात कायापालट होणार, नेमकं काय बदलणार?
  • आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे अंदाज जाहीर, नवी माहिती काय?
  • GDP च्या नव्या मालिकेत मोठे बदल; मॅन्युफॅक्चरिंगच्या GVA मध्ये महागाई उणे का? सरकारने दिले स्पष्टीकरण
  • 400 वर्षांपूर्वीचा जुना महल, मार्क झुकरबर्गने खरेदी केलं आलिशान नवं घर, फोटो पाहून चकित व्हाल!
  • Jio Recharge : जिओच्या ग्राहकांची चिंताच मिटली! दररोज 3GB डेटा, Netflix अन् हॉटस्टार फ्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in