• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जया बच्चन तर उगाच बदनाम, ‘या’ 4 अभिनेत्रींसोबत रेखा यांचा 36 चा आकडा, दुसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण

September 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील त्याचे सिनेमे प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. बॉलिवूडचा एका काळ रेखा यांच्या नावावर नोंदवला आहे.. अभिनय असो किंवा डान्स… रेखा यांनी चाहत्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. आज रेखा अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. आज रेखा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत रेखा यांच्या ३६ चा आकडा आहे. तर जाणून घ्या रेखा यांच्याकोणत्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींचा ३६ चा आकडा आहे.

रेखा यांच्या शत्रूंच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री जया बच्चन याचं आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी तेव्हा जोर धरला, जेव्हा बिग बी यांचं लग्न जया बच्चन यांच्यासोबत झालं होतं. मोठ्या पडद्यावर रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अशात पडद्यामागे देखील दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. ही गोष्टी जया यांना कळल्यानंतर दोघींमध्ये वाद सुरु झाले…

फत्त जया बच्चनच नाही तर, दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्यासोबत देखील रेखा यांचे वाद होते. मीडिया रिपोर्टनुसार, 1976 साली एका मुलखतीत नर्गिस यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. रेखा यांचं नाव सुनील दत्त यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. ज्यामुळे नर्गिस प्रचंड संतापलेल्या. त्यानंतर रेखा यांच्या नावाची चर्चा संजय दत्त याच्यासोबत देखील रंगू लागली. याच कारणामुळे नर्गिस यांनी रेखा यांना चांगलंच सुनावलं होतं.

मौसमी चॅटर्जी यांच्यासोबत देखील रेखा यांचे वाद होते. कामाच्या बाबतीत आपण रेखा यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही आणि म्हणूनच माझं नाव आधी असायला हवं होतं…. असं मत मौसमी यांनी व्यक्त केलं होतं. त्यांचं हे विधान त्या काळात चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतरच या दोन अभिनेत्रींमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांनी जोर धरला.

1970 च्या दशकातील ‘नागिन’ या सुपरहिट सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा एका मोठ्या वादात सापडल्या होत्या. या सिनेमात रीना रॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती, तर रेखा यांनी सहाय्यक भूमिका केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांची अशी इच्छा होती की सेटवर त्यांनाही रीना रॉय यांच्याप्रमाणेच विशेष वागणूक मिळावी आणि तशाच प्रकारचे कपडे दिले जावेत. जेव्हा तसं घडलं नाही, तेव्हा या दोन्ही अभिनेत्रींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर त्यांच्या वादाची चर्चा सर्वत्र रंगलेली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! सुट्टे तेल विक्री करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ , सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला
  • Nepal Flood 2026 : जलप्रलयात पोटचा गोळा गेला… आईवरच मुलासाठी खड्डा खोदण्याची वेळ; काळीज चिरणारी घटना
  • CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
  • टम्म फुग्यासारखी फुगणारी चपाती टिफिनमध्ये वातड होते? दिवसभर चपात्या मऊ ठेवण्यासाठी ही 1 सोपी ट्रिक..
  • 105 वर्षे जुने हनुमान मंदिर, जिथे नवस पूर्ण झाल्यावर भक्त चढवतात चांदीचे डोळे, कुठे आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in