
आपल्यापैकी सर्वांनाच चपाती मऊ आणि लुसलुसीत खायला आवडते. अनेकांच्या चपात्या फुगत नाहीत. महिला लुसलुशीत चपात्या तयार करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. काहींच्या चपात्या काही वेळातच वातड होतात. विशेष करून डब्यातील चपात्या वातड होतात. जेव्हा आपण घरी तव्यावर चपाती बनवतो, त्यावेळी ती मऊ आणि फुगलेली असते. गरमागरम चपाती खाण्याची मजाच काही वेगळे असते. तव्यावर चपाती कितीही मऊ असली तरीही डब्यात लगेचच चपाती कडक होते. सकाळी केलेल्या चपात्या लगेचच वातड होतात. वातड चपाती खाताना ती चपाती तुटतच नाही. काहीही केले तरीही जेवणातील चपाती मऊ राहत नाही. बऱ्याचदा आपल्यापैकी जवळपास सर्वच जण तव्यावरून चपाती थेट डब्यात टाकतात. मात्र, चपाती तव्यावरून डब्यात टाकणे योग्य नाही.
तव्यावरून गरम चपाती डब्यात टाकली आणि तिची वाफ जाऊ दिली नाही तर चपाती ओली होते. यामुळे चपातीची चवही बदलते. यासोबतच चपाती वातड होते. तव्यावरून चपाती डब्यात टाकली असली तरीही अजिबात झाकण लावून ठेऊ नका. काही सेकंद चपाती प्लेटमध्ये वगैरे ठेवा. वाफ पूर्णपणे निघू द्या आणि त्यानंतर डब्याचे झाकण बंद करा.
बऱ्याचदा चपाती फुगवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण चपाती जास्त भाजतात, ज्यामुळे चपाती अधिक वातड होते. म्हणून चपाती अधिक वेळ तव्यावर ठेऊ नका. चपाती कपड्यात गुंडाळल्याने मऊ पणा अधिक काळ टिकतो. कधीही फॉईलपेपरपेक्षा चपाती ही सुती कपड्यात ठेवा, ज्यामुळे ती अधिक मऊ राहण्यास मदत होते. मऊ चपाती तयार करण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात.
चपाती हळू आचेवर भाजली तरीही चपाती वातड होते. त्यामुळे मध्यम आचेवर शक्यतो चपाती भाजा, ज्यामुळे चपाती मऊ आणि लुसलुसीत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे मऊ चपाती खाण्यासही चांगली लागते. वातड चपाती खाल्ल्याने तोंडही दुखते आणि त्या चपातीला चवही लागत नाही. आपल्या एका चुकीमुळे आपली वातड होते आणि आपल्याला ती खाताही येत नाही.
Leave a Reply