• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातील सर्वात महाग गादी, किंमत तब्बल 7 कोटी, तयार करण्यासाठी वापरले जातात घोड्याचे केस, विशेषता काय?

September 6, 2026 by admin Leave a Comment


Most Expensive Bed : आयुष्यात सुखाची झोप लागावी, म्हणून प्रत्येकजण धडपडत असतो. आपल्या गरजा पूर्ण झाल्या, मनातील स्वप्न पूर्ण झाले की की माणसाला आपसूकच निवांत झोप लागते. सुखाची, निवांत झोप लागावी यासाठी अनेकजण काहीबाही करत असतात. काही लोक आपल्या ऐपतीप्रमाणे पलंग, गादी खरेदी करून तो झोपण्यासाठी वापरतात. तर काही श्रीमंत लोक वेगवेगळे तंत्रज्ञा वापरून तयार करण्यात आलेल्या गादीचा वापर करतात. कंबरदुखी असणाऱ्यांसाठी किंवा इतर हाडाचे आजार असणाऱ्यांसाठी विशेष तंत्र वापरून वेगळ्या पद्धतीची गादी तयार केलेली असते. अशा गाद्यांची किंमत ही हजारो रुपये असते. पण जगात काही गाद्या या प्रचंड महाग आहेत. एका गादीची किंमत तर तब्बल 7.3 कोटी रुपये आहे. एखादा सामान्य माणूस आयुष्यभर जेवढी कमाई करतो, त्यापेक्षाही जास्त किंमत या गादीची आहे.

16 प्रकारच्या गाद्या, 1852 साली सुरू झाली?

सध्या या गादीची सगळीकडेच चर्चा होत आहे. ही जगातील सर्वाधिक महागडी गादी असल्याचेही बोलले जाते. स्वीडनमधील हेस्टेंस या कंपनीकडून ही गादी तयार केली जाते. 174 वर्षांपूर्वी 1852 साली ही कंपनी सुरू करण्यात आली होती. पेर अडॉल्फ जॉन्सन यांनी या कंपनीची स्थापना केली होती. आजही त्यांचे वंशज ही कंपनी चालवतात. या कंपनीकडून सध्या वेगवेगळ्या 16 प्रकारची गादी तयार केली जाते.

सर्वाधिक महागड्या गादीची विशेषता काय?

हेस्टेंस हीच कंपनी जगातील सर्वाधिक महागडी गादी तयार करते. ग्रँड व्हिविड्स असे या गादीचे नाव आहे. तिची साधारण किंमत 7.3 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. आर्किटेक्चर डायजेस्टच्या रिपोर्टनुसार ही गादी मशीनचा वापर न करता कारागीर आपल्या हातांनी तयार करतात. ही गादी तयार करण्यासाठी एकूण 600 तास लागतात. या गादीची विशेषता म्हणजे ती तयार करण्यासाठी घोड्याच्या शेपटीचे केस वापरले जातात. तसेच कॉटन, उल, प्लॅक्सचाही यासाठी वापर केला जातो. घोड्याच्या केसांमुळे ही गादी अगदी नरम होते. या गादीची एकूण 25 वर्षांची वॉरंटी आहे. भारतातही या कंपनीचे एकूण सात स्टोअर्स आहेत. दिल्लीच्या डिफेन्स कॉलिनी, एनजी रोडवर या कंपनीचे स्टोअर्स आहेत. मुंबईत वरळीतही या कंपनीचे स्टोअर आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…
  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in