• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म, गरिबीत काढलं बालपण; ऐश्वर्याइतकी सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बदललं नशीब

July 14, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मलेल्या अभिनेत्री भाग्यश्री बोरसेनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लहानपणापासून केलेल्या संघर्षाचा खुलासा केला आहे. भाग्यश्रीचा जन्म एका 'लोअर मिडल क्लास' कुटुंबात झाला आणि तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या वडिलांची नोकरी गेली होती.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मलेल्या अभिनेत्री भाग्यश्री बोरसेनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लहानपणापासून केलेल्या संघर्षाचा खुलासा केला आहे. भाग्यश्रीचा जन्म एका 'लोअर मिडल क्लास' कुटुंबात झाला आणि तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या वडिलांची नोकरी गेली होती.

'ऑनेस्ट टाऊनहॉल'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली मी जन्मापासूनच आयुष्याची एक वेगळी बाजू पाहिली ाहे. आजकाल कुटुंबांमध्ये जशी स्थिरता दिसते तशी मी कधीही पाहिली नव्हती. माझ्या आईवडिलांना मी नेहमीच अडचणींचा सामना करताना पाहिलंय. आम्ही शून्यातून सुरुवात करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी माझ्या पालकांना दहा रुपयांना मिळणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि दहा रुपयांच्या पालकच्या जुडीच्या किमतीचाही हिशोब ठेवताना पाहिलं आहे.

'ऑनेस्ट टाऊनहॉल'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, “मी जन्मापासूनच आयुष्याची एक वेगळी बाजू पाहिली ाहे. आजकाल कुटुंबांमध्ये जशी स्थिरता दिसते, तशी मी कधीही पाहिली नव्हती. माझ्या आईवडिलांना मी नेहमीच अडचणींचा सामना करताना पाहिलंय. आम्ही शून्यातून सुरुवात करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी माझ्या पालकांना दहा रुपयांना मिळणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि दहा रुपयांच्या पालकच्या जुडीच्या किमतीचाही हिशोब ठेवताना पाहिलं आहे.”

तेव्हा परिस्थिती अशी होती की जर आम्ही एका आठवड्यात 300 रुपये खर्च केले तर पुढचा आठवडा कसा काढायचा हा प्रश्न होता. मी माझ्या वडिलांना कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं की कृपया मला नोकरी द्या मला दोन मुली आहेत. आपल्या वडिलांनी असं बोलावं असं कोणत्याच मुलीला वाटणार नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्या वडिलांसोबत असं पुन्हा कधीही घडू नये असं तिने सांगितलं.

तेव्हा परिस्थिती अशी होती की जर आम्ही एका आठवड्यात 300 रुपये खर्च केले, तर पुढचा आठवडा कसा काढायचा, हा प्रश्न होता. मी माझ्या वडिलांना कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं की, कृपया मला नोकरी द्या, मला दोन मुली आहेत. आपल्या वडिलांनी असं बोलावं असं कोणत्याच मुलीला वाटणार नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्या वडिलांसोबत असं पुन्हा कधीही घडू नये”, असं तिने सांगितलं.

माझ्या आई-वडिलांची मान नेहमी अभिमानाने उंचावलेली राहील यासाठी मला मोठी झाल्यावर काम करायचं होतं. या घटनेनं मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. माझी आज जी काही महत्त्वाकांक्षा आहे ती माझ्या आई-वडिलांसाठीच आहे अशा शब्दांत भाग्यश्री व्यक्त झाली.

माझ्या आई-वडिलांची मान नेहमी अभिमानाने उंचावलेली राहील, यासाठी मला मोठी झाल्यावर काम करायचं होतं. या घटनेनं मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. माझी आज जी काही महत्त्वाकांक्षा आहे, ती माझ्या आई-वडिलांसाठीच आहे”, अशा शब्दांत भाग्यश्री व्यक्त झाली.

भाग्यश्री बोरसेनं 2023 मध्ये 'यारियाँ 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसली. सध्या भाग्यश्री तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतेय. गेल्या दोन वर्षांत तिने पाच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

भाग्यश्री बोरसेनं 2023 मध्ये 'यारियाँ 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसली. सध्या भाग्यश्री तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतेय. गेल्या दोन वर्षांत तिने पाच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in