• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदाचं हे काय झालं..? दात तुटले, चेहऱ्यावर… असं काय घडलं? नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा

July 13, 2026 by admin Leave a Comment


जेव्हा जेव्हा बॉलिवूडचा नंबर 1 हिरो गोविंदा कॅमेऱ्यासमोर येतो, तेव्हा चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नीट लक्ष देऊन पाहतात. कधी त्याच्या डान्सच्या स्टेप्समुळे, तर कधी त्याच्या स्टाईलमुळे चाहते गोविंदावर वर्षानेवुर्षे फिदा असलेले पाहायला मिळाले.  गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहुजासोबत ‘लॉक अप 2’ या शोमध्ये दिसला आणि त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली. काही काळापूर्वी गोविंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मनसोक्त हसताना दिसत होता. त्याच्या हसण्यासोबतच चाहत्यांच्या लक्षात त्याचा एक दाट तुटलेला आहे. आता यातच जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

नवीन व्हिडिओमध्ये, गोविंदाचा तुटलेला दात आता तुटलेला नसून तो पूर्णपणे रिपेर केल्याचा पाहायला मिळाला. लोक त्याला ट्रॉल करत आहे की या वयात कशाला उगाचच नको ते उद्योग करायचे आहेत. ‘लॉक अप 2’ या शोमध्ये गोविंदाच्या लूकने सर्वच जण त्याच्यावर पुन्हा फिदा झाले, तो पूर्वीपेक्षा अधिक फ्रेश आणि फिट दिसत होता. त्याची देहबोली आणि आत्मविश्वास यांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक युझर्सनी कमेंट केली की गोविंदा स्वतःची काळजी घेत आहे हे पाहून छान वाटले. त्यांचा विश्वास आहे की, जर त्याने आपल्या फिटनेस आणि दिसण्यावर काम करणे सुरू ठेवले, तर तो अजूनही मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसू शकतो.

गोविंदाच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सोशल मीडियावर आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. काही युझर्सनी तर, “गोविंदाने बोटॉक्स केले आहे का?” असेही विचारले. लोकांच्या मते, त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक नितळ आणि तरुण दिसतो. विशेष म्हणजे, गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजा यांनी अलीकडेच सांगितले की, गोविंदा त्याच्या वयाच्या इतरांप्रमाणे स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही. त्यांचा विश्वास होता की, जर गोविंदाने आपल्या फिटनेस आणि दिसण्यावर लक्ष केंद्रित केले, तर तो अजूनही मोठ्या पडद्यावरील हिरो बनू शकतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in