• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोळ्यांच्या मध्यभागी का असते एक Line, ‘त्या’ लाईनला काय म्हणतात?

June 27, 2026 by admin Leave a Comment


अनेक औषधांच्या गोळ्या अशा असतात, ज्यांच्या मध्यभागी लाईन एक रेष असते. अनेकांना असं वाटतं की, लाईन म्हणजे फक्त एक डेकोरेशनचा भाग असेल.. पण असं नाही. खरं तर या रेषेला एक वेगळं महत्त्व आहे. औषधनिर्माणशास्त्राच्या भाषेत, या खुणेला ‘स्कोर लाइन’ असं म्हणतात. याचा उद्देश केवळ गोळी सुंदर दिसावी हा नसून, गरज पडल्यास औषधाचे समान भाग करण्यास मदत करणे हा देखील आहे. अनेक रुग्णांना डॉक्टर अर्धी गोळी घेण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत, खाच असलेली गोळी सहजपणे आणि प्रमाणात दोन अर्ध्या भागांमध्ये विभागता येते. यामुळे रुग्णाला औषधाची आवश्यक मात्रा मिळते आणि औषधाच्या मात्रेमध्ये मोठी चूक होण्याची शक्यता कमी होते.

पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, प्रत्येक गोळीचे दोन तुकडे करणं योग्य नाही. काही औषधांवर खाच नसते आणि ती संपूर्ण गोळी म्हणूनच घ्यावी लागते. दुसरीकडे, काही गोळ्यांच्या बाहेरील बाजूस रेषा असू शकतात, परंतु हे केवळ उत्पादन प्रक्रियेमुळे किंवा रचनेमुळे असू शकते. त्यामुळे, कोणतीही गोळी तोडण्यापूर्वी पॅकेटवरील सूचना वाचणे किंवा डॉक्टर वा फार्मासिस्टचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

डॉक्टर कधीच गोळी तोडण्याची किंवा चुरण्याचा सल्ला देत नाहीत, विशेषतः ज्या औषधांवर सस्टेन्ड रिलीज (SR), कंट्रोल्ड रिलीज (CR), एक्सटेंडेड रिलीज (ER) किंवा कोटिंग असते. अशी औषधे विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली असतात, जेणेकरून औषधाचा शरीरावर हळूहळू परिणाम होतो. जर ती तोडली गेली, तर औषधाचा परिणाम बदलू शकतो आणि काहीवेळा दुष्परिणामांचा धोका देखील वाढू शकतो.

जे लोक औषध गिळू शकत नाहीत, ते आपल्या मर्जीनुसार गोळी तोडतात किंवा चुरा करतात. परंतु असं केल्याने औषधाच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकतो. काही औषधांवर पोटातील आम्लापासून संरक्षण करण्यासाठी एक बाह्य आवरण असते. जर हे आवरण तुटले, तर औषध योग्यरित्या काम करणार नाही.

जर डॉक्टरांनी तुम्हाला अर्धी गोळी घ्यायला सांगितली असेल, तर मध्ये लाईन म्हणजे रेष असलेली गोळीच वापरा. ​औषधोपचारासंबंधी कोणताही निर्णय स्वतःहून घेण्याऐवजी नेहमी वैद्यकीय सल्ल्याचं पालन करा, ते तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक राहिल. औषधाच्या गोळीवरील लहान, दिसणारी लाईन रुग्णाला औषधाची योग्य मात्रा मिळावी यासाठी असते, परंतु ते केव्हा आणि कसे वापरावे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in