• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला खंडणी आणि ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर , काय केलं होतं?

July 18, 2026 by admin Leave a Comment


जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटपटूला अटक केल्यानंतर क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. नेमकं काय झालं? म्हणून चर्चांना उधाण आलं होतं. पण तिने केलेलं कृत्य आणि आरोप पाहता अनेकांना धक्का बसला. मुंबई गुन्हे शाखेने जम्मू काश्मीर टी20 लीगशी संबंधित महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक केली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार तहसीलची रहिवासी असलेल्या फरखांदा खानला तिचा भाऊ बाझिल खान याच्यासह या वर्षी एप्रिलमध्ये नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा साथीदार इम्तियाज उद्दीन वानी याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली होती. अडीच महिने तुरूंगाची हवा खाल्ल्यानंतर महिला क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला एस्प्लेनेड न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटपटू फरखांदा खानने कथितरित्या एका 28 वर्षीय व्यावसायिकाशी फोनवरून आणि ऑनलाइन चॅटद्वारे संपर्क साधला होता. हा इसम कुलाबा येथे राहणारा आहे. 2024 साली सदर इसमाची फरखांदा खान हिच्यासोबत पश्चिम उपनगरात ओळख झाली होती. मोबाईल चॅट्समधून त्यांची ओळख वाढत गेली. त्यानंतर आरोपीने अश्लील संभाषण सुरू झालं. त्यानंतर पीडित इसम जाळ्यात अडकल्याचं पाहून फरखांदा खानने प्लान रचला. पोलिसांनी पुढे माहिती देत सांगितलं की, तिने तिचा भाऊ बाझिल खान आणि साथीदार इम्तियाज वानी यांच्यासोबत मिळून पीडित व्यक्तीला धमकावण्याचा सपाटा लावला. तसेच त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पण त्याने सुरूवातील पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिने खासगी चॅट सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडित व्यक्तीने 30 एप्रिल 2024 ते 13 जानेवारी 2026 दरम्यान 32 बँक ट्रान्झक्शनच्या माध्यमातून तब्बल 63 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पीडित व्यक्तीने या रकमेचा बराचसा भाग इम्तियाज वाणी खात्यात ट्रान्सफर केला होता. तसेच काही रक्कम फरखांदाचे वडील अब्दुल अझीझ खान यांच्या खात्यातही वर्ग केली होती. पीडित व्यक्ती घाबरल्याचं पाहून वानी आणि बाझिल खानने त्याला धमक्या देणं सुरूच ठेवलं. सदर चॅट उघड करून तुरूंगवारी घडवू अशी भीती दाखवली. या धमक्यांना घाबरून जानेवारी 2026 मध्ये पीडित व्यक्तीने आरोपींच्या खात्यात 40 लाख ट्रान्सफर केले होते. पण इतके पैसे वर्ग करूनही ब्लॅकमेलिंग काही थांबलं नाही. त्यामुळे त्याने पोलिसात तक्रार केली. अखेर पोलिसांनी फरखांदा आणि तिला साथ देणाऱ्या दोघांन अटक केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
  • मोहन भागवत अमेरिकेत जाण्यापूर्वीच राऊत यांचा काय सल्ला? नेमकं काय म्हणाले?
  • ‘काही निहायती गवार लोक…’ मराठी भाषेच्या वादावरुन मनसेवर भडकली अभिनेत्री
  • Insta-Facebook या काळात वापरताच नाही येणार कारण तरी काय? मोठी अपडेट समोर
  • Mahayuti Govt : मित्र पक्षांना सोबत ठेवायचय, त्यामुळे..भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातील भाजपं नेत्यांना महत्वाचा संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in