
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावरून निर्माण झालेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कालच्या आंदोलनाचा निषेध म्हणून आंदोलन पुकारले होते, तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी राजेश क्षीरसागर यांचे समर्थक मैदानात उतरले. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना आव्हान दिले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हटवण्याचा प्रयत्न केला. राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांना पोलिसांनी घेऊन गेले असले तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अजूनही चौकात थांबून होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टी विरुद्ध राजेश क्षीरसागर असा नवा संघर्ष शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्ताने उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a Reply