• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉकरोचनंतर आता तत्काळ नव्या पार्टीची घोषणा, केली ही सर्वात मोठी मागणी; सरकारचं टेन्शन वाढणार!

July 26, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असे या पार्टीचे नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र, आता इथेनॉल मिश्रित इंधन (E20) पुन्हा चर्चेत आले आहे.

E20 जनता पार्टी म्हणजे काय?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, E20 जनता पार्टी स्वतःला नागरिकांच्या वतीने चालवली जाणारी ग्राहक हक्कांची मोहीम असल्याचे सांगते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासाठी स्वतंत्र हँडलही तयार करण्यात आले आहे. या पार्टीचे म्हणणे आहे की, ‘इंधन धोरणामध्ये पारदर्शकता, योग्य माहिती आणि ग्राहकांच्या पसंतीचा आदर केला गेला पाहिजे. इतर उत्पादनांप्रमाणेच पेट्रोल खरेदी करतानाही ग्राहकांना स्वतःच्या पसंतीचे इंधन निवडण्याचा अधिकार मिळायला हवा.

E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे. सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, त्यांची सब्सिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. आम्हीला फक्त एवढेच हवे आहे की, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा. या पार्टीने म्हटले की, ‘अनेक वाहनमालकांनी मायलेज कमी होणे, इंजिनमध्ये बिघाड, देखभाल खर्च वाढणे आणि दीर्घकालीन इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा.’

🚨 STOP EXPERIMENTING ON OUR CARS! INDIA DEMANDS CHOICE OF FUEL!

Our vehicles are NOT test machines. We bought them with our hard-earned money after paying taxes years in advance.

We are a middle-class majority country, and fuel efficiency + vehicle performance directly impacts… pic.twitter.com/6wI0vquOCP

— E20 JANTA PARTY (@E20Party) July 26, 2026

E20 जनता पार्टीने पुढील काही मागण्याही केल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी. विविध इंधन मिश्रणांचे फायदे आणि तोटे याबाबतची माहिती द्यावी. मायलेज, इंजिनवरील परिणाम, प्रदूषण आणि देखभाल खर्च यावर स्वतंत्र संशोधन करून त्याचे अहवाल नागरिकांसमोर मांडावेत. ग्राहकांना संपूर्ण माहितीच्या आधारे कोणते इंधन खरेदी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा.

CJP शी साम्य काय?

E20 जनता पार्टी कॉकरोच जनता पार्टी सारखीच दिसते. ही मोहीमही सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंग्याच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात मे 2026 मध्ये एका सटायर (व्यंगात्मक) मोहिमेच्या स्वरूपात झाली होती. मात्र, नंतर NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ही मोहीम देशाच्या राजधानीत मोठ्या विद्यार्थी आंदोलनात परिवर्तित झाली, ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला. E20 जनता पार्टीनेही त्याच पद्धतीचा अवलंब केला आहे.

सध्या फक्त डिजिटल मोहीम

सध्या तरी E20 जनता पार्टी ही कोणतीही अधिकृत संघटना नाही. या मोहिमेचा कोणताही अधिकृत संस्थापक, संघटनात्मक रचना किंवा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरचे आंदोलन अद्याप झालेले नाही. ही मोहीम सध्या सोशल मीडियावरील डिजिटल अभियान म्हणून सक्रिय आहे. असं असलं तरी X आणि इन्स्टाग्रामवर या मोहिमेला झपाट्याने प्रतिसाद मिळत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in