• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुणबी प्रमाणपत्रांपासून ते सातारा गॅझेटपर्यंत… काय काय मान्य? काय ठरलं? अखेर जरांगेंच्या उपोषणाची सांगता

May 30, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विविध मागण्यांवर अखेर मार्ग निघाला आहे. जरांगे यांच्या सर्व मागण्यांची येत्या 2 ते 3 दिवसात मान्य करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. जरांगे यांनीही विखे पाटलांच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण सोडलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी शिष्टाई केल्याने हे उपोषण अखेर सुटलं. उपोषण सोडण्यापूर्वी काय काय मागण्या मान्य झाल्या? कोणत्या मागण्यांसाठी किती वेळ देण्यात आला? याचाच घेतलेला हा आढावा.

काय काय ठरलं?

>> 58 लाख नोदी सापडलत त्याचा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलेडीटी द्या, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून 15 दिवसाला आढावा घेणार. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार.

>> मराठा आणि कुणबी याला स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. मंत्रालयासाठी मी महिनाभर थांबणार नाही, OBC ना मंत्रालय आहे आपल्याला का नाही?

>> कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना व्हॅलिडिटी दिली पाहिजे. व्हॅलिडिटीला अडचण आली तर विखे पाटील यांच्याकडून एक हेल्पलाईन नंबर जाहीर

>> सातारा गॅझेटीयर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला.

>> खोटे गुन्हे दाखल केले आहेत काही पुरावे नाहीत. आमच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यायचे नसेल तर आमच्याही पोलिसांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.

>> NCRT चा मराठा साम्राज्याचा नकाशा करून घ्या केंद्रात जा कुठेही जा तो उडवला आहे.

विखे पाटील काय म्हणाले?

सर्व मागण्या मान्य झाल्यावर विखे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मुंबईच्या आंदोलनानंतर अनेक निर्णय झाले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अजूनही काही निर्णयाबाबत शंका होते. त्यासाठी त्यांनी आज पुन्हा आंदोलन सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यापुढे सुद्धा समाज बांधवांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. या आंदोलनातही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. जरांगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, त्यामुळे समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो आहे, त्यांच सुद्धा मी अभिनंदन करतो, असं विखे पाटील म्हणाले.

आजच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यावर आम्ही दोन-तीन दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणी सुरू करत आहे. आम्ही जो प्रस्ताव मांडला, त्याला जरांगे पाटील आणि अभ्यासकांनी मान्यता दिली. त्यांचं अभिनंदन करतो. जरांगे पाटलांनी सुरु केलेलं उपोषण स्थगित करावं असं मी त्यांना आवाहन करतो, असंही ते म्हणाले.

जरांगे काय म्हणाले?

यावेळी मनोज जरांगे पाटीलही आंदोलकांशी संवाद साधला. शिष्टमंडळाचं म्हणणं आहे दोन-तीन दिवसात जीआर काढतो. जीआर काढला नाही तर पुन्हा उपोषण सुरू करतो. सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हटल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. आता उपोषण सोडायचं का? तुम्ही जर नाही म्हणत असाल तर मी मंडपात उपोषण सुरू करतो. उन्हातलं बंद करू, असं जरांगे म्हणाले. तेव्हा सर्वांनी एकमुखाने उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध
  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..
  • BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
  • वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले
  • Gold Rate Today : सोन्याने आज कहरच केला ! 10 ग्रॅमची किंमत आता.. जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in