• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..

June 23, 2026 by admin Leave a Comment


मुंबईकरांची अखेर पावसाची मोठी प्रतिक्षा संपली आहे. मॉन्सून दाखल झाला. आज मुंबईच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला आहे. राज्यभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस उशीरा दाखल झाला. जूनचा शेवटचा आठवडा मॉन्सून राज्यात दाखल होण्याकरिता लागला. यासोबतच मुंबईमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट उभे होते. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रगती झाली. ज्यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल.  मान्सूनची उत्तरेकडील सीमा पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर,अलिबाग, सुंदरगड, गया आहे. या भागातून मॉन्सून वाटचाल करत आहे. पुढील 48 तासांत परिस्थिती अनुकूल राहील, ज्यामुळे नैऋत्य मान्सूनला मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत आगेकूच करण्यास मदत होऊ शकेल.

मुंबईसह उपनगरांमध्ये मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहर आणि उनगरात मुसळधार पाऊस आज होईल. आज मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सकाळपासून मुंबईत पावसाची जोरदार हजेरी असून ढग दाटून आली आहेत.  कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसरमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय झाला. कांदिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबई उपनगरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर या संपूर्ण पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागिरकांना मोठा दिलासा मिळत आहे. आज मुंबईला यलो अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला. यासोबतच पुढील काही तासात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला. नाशिकला पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला. काल शहरातील काही परिसरात पावसाचा तुरळक शिडकाव झाला. कमाल तापमानात देखील मागील 24 तासात घट झाली. काही भागात आता पावसाला सुरूवात झाली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Haiwaan Trailer : अक्षय कुमारच्या क्रौर्यासमोर सैफ अली खानची जीव वाचवण्यासाठी धडपड; ‘हैवान’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in