• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Haiwaan Trailer : अक्षय कुमारच्या क्रौर्यासमोर सैफ अली खानची जीव वाचवण्यासाठी धडपड; ‘हैवान’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

August 25, 2026 by admin Leave a Comment


Haiwaan Trailer : अभिनेता अक्षय कुमार (Akshay kuymar) आणि प्रियदर्शन यांची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. याच वर्षाच्या सुरूवातीला ते ‘भूत बंगला’ घेऊन आले, ज्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम लाभलं. त्यानंतर अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपटही रिलीज झाला. मात्र आता प्रियदर्शनच्या चित्रपटात तो ‘हैवान’ (Haiwaan) बनलेला दिसतोय. या खास चित्रपटात अक्षय बऱ्याच वर्षांनी रोलमध्ये भूमिकेत असून सैफ अली खानही (Saif Ali Khan) प्रमुख भूमिकेत आहे. या दोघांच्या टक्करीत सैफ स्वत:चा जीव वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न करताना दिसतो. दृष्टि नसणाऱ्या एका इसमाची भूमिका त्याने यात साकारली आहे. पण त्याची ऐकण्याची क्षमता एवढी चांगली आहे की हैवान यायच्या आतच त्याल सगळं काही सजमतं. पुढल्या महिन्यात म्हणजे 11 सप्टेबर 2026 ला हा चित्रपट येणार असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून तो पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.

‘ओप्पम’ चा रीमेक आहे ‘हैवान’

मिळालेल्या माहितीनुसार, ‘हैवान’ हा 2016 साली आलेल्या ‘ओप्पम’ या मल्याळम थ्रिलरचा रिमेक आहे, हा चित्रपटही प्रियदर्शन यांनीच दिग्दर्शित केला होता. तसेच या चित्रपटात मोहनलाल यांचाही कॅमिओ असणार आहे. शूटिंगदरम्यानच निर्मात्यांनी याबाबत घोषणा केली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून त्यामध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्याशिवाय आणखी अनेक कलाकार दिसत आहेत. यामध्ये बोमन ईरानी, श्रिया पिळगावकर, सैयामी खेर, राजपाल यादव, शारिब हाशमी, राजेश शर्मा, पहल चौधरी आणि मनोज जोशी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

अक्षय कुमारचा तूफान अंदाज, सैफही ठरला वरचढ

या ट्रेलरमध्ये ‘हैवान’ची क्रूरता पाहायला मिळते. अक्षय कुमार केवळ सैफ अली खानच्या पात्राच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मागे लागलेला नाही, तर त्याने यापूर्वी अनेक कुटुंबांची हत्या केलेली असतेय . कधी कारमध्ये, तर कधी घरात घुसून हा हैवान लोकांचा जीव घेताना दिसतो. मात्र यावेळी त्याचा सामना सैफ अली खानशी होणार आहे. सैफचे पात्र नेत्रहीन असलं तरी त्याला या हैवानाची भीती वाटत आहे. त्याच्यापासून वाचण्यासाठी तो सतत प्रयत्न करताना दिसतो. चित्रपटात सैयामी खेर ही पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भीतीपासून पळून सैफ पोलिसांकडेही मदतीसाठी पोहोचतो, मात्र तिथेही त्याला कोणतीही मदत मिळत नाही.

या ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे, ज्यामध्ये सैफ अली खानलाच पोलीस मारहाण करताना दिसतात. सैफ आणि त्याचं कुटुंब हे अक्षय कुमारच्या पात्राचे शेवटचं टार्गेट आहे. त्यांना मारण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. तुझ्या बदल्याच्या आगीत आणईख किती निरपराधांचा जीव घेणार ? असा सवाल सैफ त्याला विचारतो. शेवटी सैफ स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यात यशस्वी ठरतो की अक्षयचे मनसुबे पूर्ण होतात, हे तर चित्रपट पाहूनच समजेल.
2 मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला असून चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट पहात आहेत.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in