• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किसिंग सीन आणि नियंत्रण गमावलेल्या कंगना राणौत, अभिनेत्याच्या ओठांचा चावा घेतला, रक्त येईपर्यंत…

June 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची बेधडक अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कायम त्यांच्या सिनेमांमुळे, परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता आता कंगना त्यांच्या एका किसिंग सीनमुळे चर्चेत आल्या आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कंगना राणौत स्टारर ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाच्या एका किस्स्याची चर्चा रंगली आहे. या सिनेमात कंगना यांनी अभिनेता वीर दास याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली, ज्यामध्ये दोघांचं पॅशनेट किसिंग सीन चित्रित करण्यात आलेला. सांगायचं झालं तर,’रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला. आता सिनेमा चर्चेत आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सिमी चंडोक यांनी सीनबद्दल मोठा दावा केला आहे, जो प्रचंड हैराण करणारा आहे.

चंडोक यांचा असा दावा आहे की, चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही कंगना थांबल्या नाहीत, ज्यामुळे वीर दास जखमी झाला. मात्र, या दाव्याच्या सत्यतेबाबत कंगना किंवा वीर दास यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये चंडोक म्हणाल्या, ‘जेव्हा कंगना ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाचं शूट करत होत्या, तेव्हा एका सीनमध्ये त्यांना वीर दास याला पॅशनेच किस करायचं होतं…’

‘अभिनेत्याला किस करत असताना कंगना यांनी स्वतःवर असलेलं सर्व नियंत्रण गमावलेलं होतं… तो कठीण काळ आठवल्यानंतर वीर दास कदाचित आजही रडत असेल. किसिंग सीनमध्ये कंगना पूर्ण हरवून गेलेल्या, दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील त्या किस करत राहिल्या. त्यांनी अभिनेत्याच्या ओठांचा रक्त येईपर्यंत चावा घेतला..’ असं देखील चंडोक म्हणाल्या…

सांगायचं झालं तर, चंडोक यांच्या वक्तव्यामुळे किसिंग सीनची चर्चा रंगली आहे. पण 2023 मध्ये देखील किस्सा चांगलाच चर्चेत आलेला. तेव्हा यावर कंगना यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत कंगना म्हणालेल्या, “हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली? हे कधी झालं?” ज्यामुळे ही फक्त अफवा असल्याच देखील स्पष्ट झालं होतं.

कंगना यांच्या ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात कंगना यांनी ‘अल्का सिंग’ या महिला राजकारणी आणि गँगस्टरची भूमिका साकारली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. पण कंगना आणि वीर दास यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in