• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काही तरी भयंकर घडणार, ट्रम्प यांचा संयम सुटला, इराणला हादरवणारी धमकी, जगात मोठी खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर जगात एका मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इराणच्या नाकेनऊ आणले, अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील या युद्धात प्रचंड नुकसान झालं. दरम्यान सध्या अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिकेच्या 21 सैन्य तळांवर हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता अधिक आक्रमक बनले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा इराणला हादरवणारी धमकी दिली आहे. इराण युद्धविरामासाठी खूप विलंब करत आहे, त्यामुळे आता त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडिया साईट ट्रूथवर पोस्ट केली आहे. या युद्धात इराणचं वायुदल, नौदल पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

इराणचं सैन्यदल पूर्णपणे नष्ट झाले आहे. इराणकडे आता वायुदल, नौदल अशा कोणत्याही गोष्टी शिल्लक नाहीयेत. इराण पूर्णपणे हारलं आहे. इराण फक्त बोलत आहे, मात्र ते प्रत्यक्षात कारवाई करत नाहीत. मध्य पूर्वेतील इराणची दादागिरी आता पूर्णपणे संपुष्टात आली आहेत. मात्र तरी देखील इराण अमेरिकेसोबत अणु करार करण्यासाठी खूप वेळ लावत आहे, त्यांना याची किंमत मोजावी लागेल, अशी थेट धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता इराणला देण्यात आली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

इराणकडून अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले

दरम्यान इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डस् (IRGC) कडून पुन्हा एकदा अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या 21 सैन्य तळांवर हल्ले केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या जॉर्डनमध्ये असलेल्या सैन्य तळांचा देखील समावेश आहे. इराणकडून अमेरिकेच्या सैन्य तळांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू; CM देवेंद्र फडणवीसांकडून ओपन चॅलेंज, कर्जमाफीबाबतही महत्त्वाचं बोलले
  • Salman Khan : सलमानने जे केलं, बॉलिवूडमध्ये कोणालाच जमणार नाही ! भाईजानने चक्क..
  • Mumbai Onion Price Hike : कांद्याने मुंबईकरांना रडवलं… कांदा महागला, किचनचं बजेट कोलमडलं
  • मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो आणि… परप्रांतीय तरुणाचे वादग्रस्त विधान
  • फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in