
नाशिकमधील आयटी कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर असताना आता नागपूरमधूनही असाच प्रकार समोर आला आहे. वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेवर (NGO) धर्मांतरण आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. या संस्थेत एचआर हेड म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष रियाज फाजिल काजी यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता नागपूर झोन 2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आरोपीकडून घाणेरडे कृत्य
पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी म्हटले की, 18 एप्रिलला मानकापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 48 वर्षीय रियाझ काझीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीला दोन वर्षांपूर्वी वाढदिवसाला फोरहेड (कपाळ) वर किस, हग (मिठी मारण्याचा) करण्याच्या प्रयत्न आणि नंतरही अनेकदा आरोपीने असा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी त्याने एका तरुणीच्या घरी फोन करून कुटुंबीयांकडे तक्रार दिली होती. आता याप्रकरणी लैंगिक छळ, आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून पीडितांना ट्रॅकिंग करत होते. या एनजीओचे 5 ठिकाणी सेंटर आहे, ते झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिकवतात. एनजीओला 4-5 पद्धतीने फंडिंग मिळते. मात्र आतापर्यंत परदेशातून कोणताही निधी मिळालेला नाही. आता आरोपीला अटक केली आहे. तक्रारदार महिलेची विचारपूस केली असता तिने सांगितले की, अनेकदा त्याने कृती केली.
नमाज पढा, रोजा ठेवा…
पुढे बोलताना नित्यानंद झा यांनी सांगितले की, एका मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे, आम्ही आणखी काही मुलींचा जबाब नोंदवत आहोत. नमाज पढा, रोजा ठेवा असं सांगितल्याचे एफआरआयमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच सांगितलेले काम केले नाही तर नोकरी वरून काढून टाकू अशा धमक्या देखील दिल्याचे समोर आले आहे. मात्र आरोपीने हे मान्य केले नाही. 302 कलम अंतर्गत एखादी व्यक्ती एखाद्याच्या धार्मिक मान्यता दुखवल्यास लावण्यात आले आहे. धर्मांतराबाबत याचा काहीही संबंध नाही.
Leave a Reply