• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओठ मोठे हवेत, ब्रेस्ट वाढव, इंजेक्शन्स घे…, पुरुषांकडून हिरोईन्सवर असणारा दबाव, दिया मिर्झा स्पष्टच बोलली

July 19, 2026 by admin Leave a Comment


Diya Mirza: ओठ मोठे हवेत, ब्रेस्ट वाढव, इंजेक्शन्स घे… असे सल्ले कायम अभिनेत्रींना इंडस्ट्री चालवणाऱ्या पुरुषांकडून दिले जातात… असा खुलासा अभिनेत्री दिया मिर्झा हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे. सांगायचं झालं तर, दिया कायम तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि सामाजिक मुद्द्यांवर असलेल्या तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. दरम्यान, मुलाखतीत दिया हिने, सौंदर्याच्या बाबतील इंडस्ट्रीतील महिलांवर असलेल्या दबावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दिया हिच्यानुसार, महिलांनाा त्यांच्या लूक्सबद्दल नको ते सल्ले देणारे पुरुषच असतात…

दिया मिर्झा हिने सांगितलं, करियरमध्ये कायम वयावरुन भेदवाभ होत राहिला आणि याचा सामना करावा लागला. पुरुष कायम अभिनेत्रीला तिच्या लुक्समध्ये बदल करण्याचे सल्ले द्यायचे… दियाने स्पष्ट केलं की, असे सल्ले फक्त पुरुषांकडूनच येत असतात. आजपर्यंत कोणतीच महिला माझ्याकडे आली नाही आणि मला म्हणाली नाही की, तुझे ओठ पातळ आहेत, इंजेक्शन घे… तुझ्या ब्रेस्टची साईज वाढव… असे सल्ले इंडस्ट्रीमध्ये फक्त पुरुष देतात.

दिया हिने सांगितल्यानुसार, ‘पुरुष कामय महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. इंडस्ट्री चालवणारे पुरुष आहेत. जर कोणती महिला तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर समाधानी नसेल तर, कदाचित असं असू शकतं, एखाद्या पुरुषाने तिला लुक्समध्ये बदल करायला सांगितले आहेत आणि हे अत्यंत भयानक आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

बाह्य रूपावर अधिक भर देणाऱ्या जगावर दिया मिर्झा हिने सडकून टीका केली आहे. अभिनेत्रीच्या मते, आपण अशा जगात राहतो जिथे बाह्य सौंदर्यावर खूप लक्ष दिलं जातं, तर व्यक्तीच्या आंतरिक रूपाकडे दुर्लक्ष केलं जातं. दिया हिच्यानुसार, कॉस्मेटिक प्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्रियांना अनेकदा अपेक्षित असलेली मानसिक शांतता मिळत नाही. असं देखील दिया म्हणाली.

दिया मिर्झा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in