• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं, घटस्फोटीत पत्नीबाबत म्हणाली…

August 13, 2026 by admin Leave a Comment


ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एश्ले गार्डनरचं तिची जोडीदार मोनिका राइटसोबत लग्न झाले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने डिसेंबर 2017 मध्ये एका ऐतिहासिक कायद्याद्वारे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानंतर 26 एप्रिल 2025 रोजी या दोघींनी लग्नगाठ बांधली होती. सात महिने संसास थाटल्यानतंर दोघींनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मोनिकाने एश्ले गार्डनर फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर एश्ले गार्डनरने इंस्टाग्रामवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं आहे.

एश्ले गार्डनरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “मी मोनिकासोबत घालवलेल्या वेळेबद्दल आभारी आहे आणि यामुळे झालेल्या वेदनांबद्दल दिलगीर आहे. मी तिच्या भविष्यासाठी सुख आणि यशासाठी शुभेच्छा देते.'

एश्ले गार्डनरने पुढे लिहिलं की, 'मी सध्या या प्रकरणी कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करणार नाही आणि यात सामील असलेल्यांच्या गोपनीयतेचा आदर राखला जावा अशी माझी विनंती आहे.'

एश्लेचं ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सहकारी खेळाडू जॉर्जिया व्होलसोबत अफेअर असल्याचं मोनिकाने सांगितलं आहे. इतकंच काय तर तिच्यासाठी फसवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मौन बाळगल्याने मोनिका राइटने टीका केली आहे. फसवणूक करणारी व्यक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची उपकर्णधार किंवा रोल मॉडेल राहण्यास पात्र नाही, असं टीकास्त्र तिने सोडलं.

मोनिका राईटने सांगितलं की, “माझा विश्वास आहे की, जर तुम्हाला तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळत असेल आणि एक आदर्श म्हणून ओळखले जात असाल, तर तुम्ही तुमची नैतिक मूल्ये देखील जपली पाहिजेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मुद्द्यावर सार्वजनिकरित्या भाष्य का केले नाही, हे मला समजत नाही.” (सर्व फोटो: टीव्ही 9 हिंदीवरून)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
  • मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..
  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in