• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑपरेशन सिंदूरदरम्यान राफेलला बदनाम करणाऱ्या त्या पायलटबद्दल खळबळजनक माहिती समोर, थेट चीन कनेक्शन समोर

July 30, 2026 by admin Leave a Comment


फ्रान्सच्या नौदलातील एका माजी पायलटला ताब्यात घेण्यात आलं आहे, फ्रान्स सरकारकडून या पायलटची कसून चौकशी सुरू आहे. हा माजी पायलट चीनचा एजेंट असल्याचा आरोप आहे. त्याने चीनच्या अन्य एजंटांना लष्करासंबंधीत अतिशय संवेदनशील अशी माहिती पुरवल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पियरे-हेनरी चुएट असं या फ्रान्सच्या नौदलातील माजी पायलटचं नाव आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, तसेच 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना देखील ठार केलं होतं. मात्र या माजी पायलटकडून ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या राफेल लढाऊ विमानांनी केलेल्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. चीनमध्ये निर्माण झालेले J-10C आणि JF-17 सारख्या लढाऊ विमानांनी भारताचं राफेल विमान पाडलं असा दावा या पायलटने केला होता, J-10C आणि JF-17 ही लढाऊ विमानं राफेल किलर असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

मात्र आता हा फ्रान्सच्या नौदलातील माजी पायलट चीनचा हेर असल्याचं समोर आलं आहे. फ्रान्सचे सरकारी वकील आणि फ्रान्सच्या प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पियरे-हेनरी चुएट याच्यावर तो चीनचा हेर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलं असून, फ्रान्स सरकारकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने लष्करासंबंधित गुप्त माहिती चीनला पुरवली असल्याचा देखील संशय आहे. या माजी पायलटकडे फ्रान्स आणि कॅनडा अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व असून, त्याने 2021 मध्ये फ्रान्सच्या नौदलामध्ये काम केलं आहे.

दोनदा चीन दौरा

दरम्यान फ्रान्सच्या मीडियाकडून असा दावा देखील करण्यात आला आहे की, सप्टेंबर 2018 आणि ऑगस्ट 2019 मध्ये या माजी पायलटने दोनदा चीनचा दौरा केला, परंतु आपल्या या दौऱ्याची कोणतीही माहिती त्याने फ्रान्स सरकारला दिली नव्हती. या माजी पायलटने चीनला गुप्त माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in