• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल

July 9, 2026 by admin Leave a Comment


रेल्वेच्या एसी डब्यात नवविवाहित जोडप्यासाठी कथितरित्या हनिमूनसाठी सजावट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये नवविवाहित दाम्पत्याच्या स्वागतासाठी फुले आणि सजावटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक रेल्वे डब्यात अशा प्रकारची सजावट केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने ऑन-ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला (Chief Ticket Inspector) निलंबित केले आहे. तसेच रेल्वे सुरक्षा नियम आणि शासकीय प्रक्रियेचे उल्लंघन झाले का, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या सजावटीसाठी अधिकृत परवानगी होती का, त्यामागे नेमके कोण जबाबदार आहे आणि रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून केला जात असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या… राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
  • Janhavi Kapoor: ठरलं तर मग! आता बहिणीनंतर जान्हवी कपूरचा नंबर? मेहंदीतूनच सगळं सांगितलं, फोटो व्हायरल
  • 50 वर्षांपूर्वीचं गाणं, निर्मात्याच्या पत्नीनेच दिला आवाज, गाणं ठरलं सुपरहिट! ऐकताच लोक…
  • देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या सुनेत्रा पवार, घडामोडींना वेग, थेट..
  • ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in