• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

July 2, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे 7 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटात फुट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी या चर्चेला पूर्वविराम दिला आहे.  देवेंद्र फडणवीस एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?  

ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात. ज्या पक्षाकडे स्वताचे निवडून आलेले १३७ आमदार आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील की इतर पक्षाचा राहील? त्याच पक्षाचा राहणार आहे. त्यामुळे या कहाण्या स्टोऱ्या किती तयार झाल्या तरी रिअॅलिटी मला माहीत आहे. वास्तव शिंदे साहेबांना माहीत आहे. त्यामुळे अशा बातम्यांनी मी विचलित होत नाही. शिंदेही विचलित होत नाही. प्रत्येकाला वाटतं आपली स्वप्न पूर्ण व्हावीत त्यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया यावर फडणवीस यांनी दिली आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान निधी मिळत नाही, म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला  असं कारण शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर आमदारांनी पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगितलं आहे. यावर देखील यावेळी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मला वाटतं अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. निधीपुरतं मर्यादित नाही, प्रोजेक्ट असतात, सोशल विषय असतात. सत्ता पक्षात किंवा विरोधात असतो तेव्हा थोडा परिणाम होतो. किंवा नेतृत्व आत्मविश्वास वाढवण्यात कमी पडतो तेव्हा असं होतं. राजकारणात लोक भविष्य पाहतात. ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतोय ते माझं भविष्य सुरक्षित करू शकत नाही असं वाटतं, तेव्हाही पक्षप्रवेश होतात, असं यावेळी फडणीस यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! उद्या उद्धव ठाकरे करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा, पत्रकार परिषद बोलावली, राजकारणात वेगवान घडामोडी
  • गरोदर होण्यासाठी मान्य केल्या विचित्र अटी, नंतर मुलगी झाल्यावर…, 35 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना घाबरतात लोक
  • घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, न्यायालयाला पाठवले बायकोचे प्रायव्हेट फोटो; चूक लक्षात येताच…
  • Chanakya Niti : या चार प्रसंगी बोलताना हजारदा विचार करा, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा तारीख दरवर्षी का बदलते? आधी 30 जून होती आता 3 जुलै, असं का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in